“खोदा पहाड और निकला…”; CSK च्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूची धोनीवर जोरदार टीका

On: April 12, 2025 8:01 AM
CSK vs KKR  Siddhu Slams Dhoni
---Advertisement---

CSK vs KKR |  कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाल्यानंतर माहीच्या निर्णयांवर टीकेची झोड उठली आहे. 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या धोनीने चाहत्यांना निराश केलं, तर माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी तर मर्यादेपलीकडची टीका केली आहे. सिद्धू यांच्या टिकेमुळे आता वेगळाच वाद निर्माण झाला आहे.  (CSK vs KKR)

सिद्धूने साधला जोरदार निशाणा

आयपीएल 2025 मध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाताविरुद्ध खराब फलंदाजी सादर केली. 16 धावांवर पहिली आणि 71 धावांवर सहावी विकेट गमावलेल्या सीएसकेकडून, त्यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून पुढे येण्याची अपेक्षा होती. मात्र त्याऐवजी धोनीने दीपक हुड्डाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवलं. हा निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

हुड्डा खातेही उघडू शकला नाही आणि अखेरीस धोनी मैदानात उतरला, पण तोपर्यंत संघ मोठ्या दबावात आला होता. मैदानात येताना प्रेक्षकांमध्ये जल्लोष होता, पण फक्त 4 चेंडूत 1  धाव काढून धोनी बाद झाल्यामुळे तो चाहत्यांच्या निराशेचं कारणही बनला. अजिंक्य रहाणेने धोनीवर कसोटी सामन्यासारखे क्षेत्ररक्षण लावले होते, ज्यामुळे धोनीवर दबाव अधिक वाढला.

या परिस्थितीत भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी कमालीची टीका केली. त्यांनी म्हटलं, “सिंह आल्यासारखा आवाज झाला, पण जेव्हा डोंगर खोदला गेला तेव्हा एक उंदीर बाहेर आला”  तसेच, त्यांनी सीएसकेला “जप्त झालेलं इंजिन” म्हटले. अंबाती रायुडूनेही धोनीच्या उशिरा मैदानात येण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.

धोनीच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह

ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी धोनीकडे परत आली, पण कोलकाताविरुद्धचा पहिलाच सामना पराभवात बदलला. चाहत्यांना वाटलं की धोनीच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा उभारी घेईल, पण त्यांच्या निर्णयांनी उलट निराशाच वाढवली. फलंदाजीचा क्रम आणि योग्य वेळी मैदानात न उतरल्याने संघावर दडपण वाढलं. (CSK vs KKR)

अंतिम फळ म्हणजे फक्त एक धाव काढून परतलेला धोनी आणि पराभवाची नोंद. यामुळे सोशल मीडियावर चाहते, तज्ज्ञ आणि माजी खेळाडू  सर्वांनीच  टीका करण्यास सुरुवात केली. मात्र काहींनी सिद्धूच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्याला “अमर्याद” आणि “अवमानजनक” म्हटलं.

 English Title: CSK vs KKR  Siddhu Slams Dhoni After CSK Loss  

 

Join WhatsApp Group

Join Now