‘मी गेल्यावर…’, पत्नीच्या जाचामुळे तरूणाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे

On: January 22, 2025 12:26 PM
Crime News
---Advertisement---

Crime News | मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूर (Indore) शहरात एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नी (Wife) आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. (Crime News)

नितीन पडियार (Nitin Padiyar) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो इव्हेंट फोटोग्राफर (Event Photographer) म्हणून काम करत होता. इंदूरच्या बाणगंगा (Banganga) पोलीस स्टेशन (Police Station) परिसरात राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) गंभीर आरोप

नितीनने आपल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी वर्षा शर्मा (Varsha Sharma), सासू सीता शर्मा (Sita Sharma) आणि मेहुणी मीनाक्षी (Meenakshi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी (Dowry) छळ आणि ३० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच, “सरकारने हुंडाबंदी कायद्यात (Dowry Prohibition Act) बदल करावा, महिला त्याचा गैरवापर करत आहेत,” असेही त्याने सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) नमूद केले आहे. (Crime News)

आईसाठी भावनिक संदेश

आपल्या आईला उद्देशून लिहिलेल्या संदेशात नितीन म्हणतो, “माझ्या जाण्याने रडू नकोस आणि कोणाला रडू देऊ नकोस, जर तुम्ही लोक दु:खी झाले तर मला मृत्यूनंतरही त्रास होईल. मी तुझा मुलगा म्हणून परत येईन.”

पोलिसांचा (Police) तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन नितीनचा मृतदेह (Dead Body) ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवला. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोटही (Suicide Note) जप्त केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. (Crime News)

या घटनेने बंगळुरूच्या (Bangalore) अतुल सुभाष (Atul Subhash) आत्महत्या प्रकरणाची आठवण करून दिली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांकडून कायद्याचा होणारा गैरवापर यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Title : Crime News Youth Commits Suicide Due to Harassment by Wife in Madhya Pradesh

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now