संतापजनक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या टॉयलेटमध्ये टाकून अज्ञात पालक पसार

On: September 9, 2024 12:38 PM
Crime News small baby found in train toilet  
---Advertisement---

Crime News | मुंबई देवगिरी एक्सप्रेसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ट्रेनच्या टॉयलेटमध्ये चक्क एक-दीड महिन्याची मुलगी झोपलेली दिसल्यानं खळबळ उडाली आहे. या बाळाच्या अज्ञात पालकांविरोधात मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अवघ्या 1 वर्षाच्या बाळाला असं टॉयलेटमध्ये टाकल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (Crime News)

देवगिरी एक्सप्रेसमध्ये एक दीड वर्षाची मुलगी कमोडच्या शेजारी ओढणीवर झोपलेली आढळली. यानंतर रेल्वेतील प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. इतर प्रवाशांनी हे दृश्य पाहिल्यावर तेथे सर्वांनाच धक्का बसला. या बाळाच्या अज्ञात पालकांविरोधात आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Crime News)

मुंबई-देवगिरी एक्सप्रेसमध्ये संतापजनक प्रकार

नांदेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर बाथरूममधून लहान मुलांचा रडण्याचा आवाज आल्याने प्रवाशांनी चौकशी केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. मनमाड रेल्वे स्थानकावर बालकाला उतरविण्यात आले असून त्यास नाशिक येथे बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

या घटनेमुळे एकच संताप व्यक्त केला जातोय. यामुळे देशात नवजात बाळांना उकीरड्यावर टाकून देणाऱ्यांची विकृती पुन्हा एकदा समोर आली आहे. या प्रकरणी आता तपास केला जात आहे. मुंबई देवगिरी एक्सप्रेसमध्ये हा प्रकार समोर आला आहे. (Crime News)

या घटनेमुळे पालकांच्या विकृतीचा कळस पहायला मिळाला. अवघ्या एक-दीड महिन्याच्या बाळाला टॉयलेटमध्ये झोपलेल्या अवस्थेत सोडून पालक फरार झाले आहेत. या प्रकरणी सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

News Title –  Crime News small baby found in train toilet  

महत्वाच्या बातम्या- 

कोथिंबीरच्या जुडीने खाल्ला भाव! एका जुडीची किंमत पाहून व्हाल थक्क

राज्यात आज मुसळधार! जाणून घ्या तुमच्या शहराला कोणता अलर्ट?

धक्कादायक! पुण्यात टेम्पो चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं, जागीच मृत्यू

“त्यांना लिजेंड आणि मला शिव्या..”; गीतकार गुलजार यांच्याबद्दल हनीसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

सोनं पुन्हा झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Join WhatsApp Group

Join Now