सायकलिंगसाठी बाहेर पडले ते परत आलेच नाही, बांधकाम ठेकेदारासोबत घडला भयंकर प्रकार

On: January 31, 2025 12:22 PM
entertainment news
---Advertisement---

Crime News | पुनावळे (Punawale) येथून सायकलिंगसाठी (Cycling) घराबाहेर पडलेल्या एका बांधकाम ठेकेदाराचा (Construction Contractor) 12 तासांनंतर थेट मृतदेह (Dead Body) आढळून आला. किवळे (Kiwale) येथे देहूरोड बाह्यवळण मार्गावर (Dehurod Bypass Road) बुधवारी (29 जानेवारी) सकाळी या ठेकेदाराचा मृतदेह आढळला. (Crime News )

भानूकुमार सिंग (42, रा. पुनावळे, मूळ रा. बिहार – Bihar), असे मृत्यू झालेल्या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी पूजा सिंग (वय 38) आणि मुलगी दिया सिंग (वय 8) असा परिवार आहे. भानूकुमार गेल्या काही दिवसांपासून सायकलिंग करीत होते. कामावरून परतल्यावर ते दररोज सायंकाळी सायकलिंगसाठी घरातून बाहेर पडायचे. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास घरी परतायचे. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी (28 जानेवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुनावळे येथून घरातून सायकल घेऊन बाहेर पडले. मात्र, साडेआठला ते परतले नाहीत.

मृत्यूचे कारण अस्पष्ट (Cause of Death Unclear)

वाहनाच्या धडकेने (Vehicle Collision) भानूकुमार यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, शवविच्छेदनानंतर (Postmortem) मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. भानूकुमार यांचा मृत्यू संशयास्पद वाटत असून, त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी नातेवाईकांनी (Relatives) केली आहे.

कुटुंबीयांनी त्यांच्याशी मोबाइलवरून (Mobile) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन कॉल उचललाच नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, बुधवारी (29 जानेवारी) सकाळी किवळे येथे बाह्यवळण मार्गावर भानूकुमार यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मृतदेहाजवळील मोबाइलवरून त्यांनी भानूकुमार यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी ओळख पटवली.

भानूकुमार सिंग यांचा मृत्यू संशयास्पद असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. (Crime News )

Title: Crime News Construction Contractor Found Dead After Going Out For Cycling From Punawale  

 

Join WhatsApp Group

Join Now