‘मी मंत्री आहे तर पालकमंत्री पण मीच…’; महायुतीत पालकमंत्रीपदावरून वाद

On: December 22, 2024 3:07 PM
BMC Election 2026
---Advertisement---

Grand Alliance | महायुती सरकारचे खातेवाटप शनिवारी जाहीर झाले. खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेना ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे.

इथल्या पालकमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही. मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार, असा दावा भरत गोगावले यांनी केला. शिवसेनेचे रायगड जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्री आमचाच होणार असं स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिलं आहे.

महायुतीत पालकमंत्रीपदावरून वाद

रायगडच्या सहाही आमदारांनी सांगितलेलं आहे. आम्हाला पालकमंत्री हवंय, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावर 100 टक्के दावा असल्याचं त्यांनी म्हटलं. महायुतीच्या खाटेवाटपात भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन, खार जमीन विकास या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खातं मिळाल्यानं गोगोवलेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे. ती व्यवस्थित पार पाडायची आहे. महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं करता येईल ते करायचं आहे. मला कालचं खातं मिळालेलं आहे. नेमकं त्यात काय काय आहे ते पहावं लागलं. त्यानंतर पुढची दिशा ठरवू, असं त्यांनी म्हटलं.

आता भरत गोगावले यांच्या दाव्यानंतर रायगडचे पालकमंत्रीपद नेमकं कोणाला मिळणार? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र, पाहा फोटो

ऐन थंडीत महाराष्ट्रात पावसाचं सावट, यलो अलर्ट जारी

‘या’ प्रसिद्ध आर्ट डायरेक्टरनं उचललं टोकाचं पाऊल?, सिनेसृष्टित एकच खळबळ!

अखेर मंत्रिमंडाळाचं खाते वाटप जाहीर, इथे वाचा संपूर्ण यादी

एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now