लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत वाद?; शिवसेना नेते दादांवर भडकले

On: September 4, 2024 2:32 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी अजितदादा गट आणि शिंदे गटात चढाओढ सुरु झाली आहे. अजितदादा गटाच्या जाहिरातीमधून महायुतीच्या सर्व नेत्यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Ladki Bahin Yojana) पक्षाच्या सोशल मीडियावरुन नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत वाद

जाहिरातीत ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळून ‘दादाचा वादा’ अशी टॅगलाईन वापरत लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) प्रचार करण्यात आला आहे. ‘अजित पवारांची लाडकी बहीण योजना’ असा उल्लेखही जाणीवपूर्वक जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.

या योजनेसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आणि महिलांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. यावरून महायुतीत नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून अजितदादा गट आणि शिंदे गट (Shivsena Shinde Camp) आमनेसामने उभे ठाकले आहेत.

Ladki Bahin Yojana | श्रेयवादाचं राजकारण

राज्य मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केली आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात योजनेचा प्रचार करताना अजित पवारांचा मोठा फोटो लावावा. पण अशाप्रकारच्या कृत्यांमुळे महायुतीत गैरसमज निर्माण होतात, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत.

कार्यकर्त्यांचं आपल्या नेत्यावरील प्रेम मी समजू शकतो. परंतु, एखादी योजना आणि घोषणा सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे. अर्थमंत्री आणि गृहमंत्री यांचा प्रमुख मुख्यमंत्री असतात. श्रेय अजितदादांचं पण आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं आहे, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

रुपाली चाकणकरांसाठी गुडन्यूज?, अजित पवार घेणार मोठा निर्णय

सॅमसंग कंपनीने लाँच केला स्वस्तात मस्त फोन; जाणून घ्या किंमत

गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?, समोर आली मोठी अपडेट

अजित पवार कुणाला करणार आमदार?, विधान परिषदेसाठी ‘या’ 3 नावांची चर्चा

खबरदार… विसर्जनानंतर बाप्पाचे फोटो काढाल तर पस्तावाल, पोलिसांचे आदेश काय ?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now