विधानसभेपूर्वीच कॉँग्रेसला धक्का, ‘या’ विद्यमान आमदाराचा अजित पवार गटात प्रवेश

On: October 15, 2024 9:42 AM
Congress MLA Hiraman Khoskar join ncp ajit pawar group
---Advertisement---

Congress | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांचे दिल्ली दौरे सुरू आहेत, तर काही नेते राज्य दौऱ्यावर निघाले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक जागांसाठी चाचपाणी सुरू आहे. अशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. कॉँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराने पक्षाची साथ सोडली आहे. (Congress)

इगतपुरीचे काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी कॉँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत आमदार हिरामण खोसकर यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. विधानसभेच्या तोंडावर कॉँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आमदार हिरामण खोसकर अजित पवार गटात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत एक ट्वीट देखील केलं आहे. “इगतपुरीचे आमदार आणि आदिवासी समाजाचे नेते श्री. हिरामण खोसकर यांनी आज राष्ट्रवादीचे विकासाभिमुख विचार स्वीकारत माझ्या आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार खोसकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची व लोकोपयोगी योजनांची ही पोचपावती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात मी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.”, असं ट्वीट अजितदादा यांनी केलं आहे.

दरम्यान, हिरामण खोसकर यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत त्यांनी नंतर प्रतिक्रिया देखील दिली होती. आमदार खोसकर हे कॉँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा होती. (Congress)

यामध्ये आमदार हिरामण खोसकर यांचंही नाव चर्चेत आलं होतं. मात्र, त्यांनी यासंदर्भातील सर्व आरोप फेटाळले होते. यंदा निवडणुकीत पक्ष क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांना विधानसभेचं तिकीट देणार नाही, असं म्हटलं जातंय.यातच आता आमदार हिरामण खोसकर यांनी कॉँग्रेसला धक्का देत थेट अजित पवार गटात प्रवेश केलाय. (Congress)

News Title :  Congress MLA Hiraman Khoskar join ncp ajit pawar group

महत्वाच्या बातम्या-

आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे 7 नेते होणार आमदार; विधीमंडळात आज शपथविधी

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 जणांची नावे ठरली; पाहा कुणाला लागली लॉटरी?

आज मेष ते मीनपैकी ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती!

शरद पवारांचा मोठा डाव, अजित पवारांना बसला धक्का

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार’; मुख्यमंत्र्याचं मोठं विधान

Join WhatsApp Group

Join Now