पराभव जिव्हारी लागला; काँग्रेसचा बडा नेता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

On: November 25, 2024 12:20 PM
Prakash Ambedkar
---Advertisement---

Congress | विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. त्यात कॉँग्रेसला अवघ्या 16 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कॉँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. बाळासाहेब थोरात, धीरज विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण असे बडे नेते पराभूत झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या अपयशामागील कारण पक्षश्रेष्ठी नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करतील. अशात कॉँग्रेसमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Congress )

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी काल 24 नोव्हेंबररोजी काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय.

नाना पटोले देणार राजीनामा?

काही मीडिया रिपोर्टमध्ये नाना पटोले यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याचाही दावा करण्यात आला आहे. नाना पटोले यांनी स्वतः याबाबत अद्याप काहीच सांगितले नाही. मात्र, ते राजीनामा देणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

अद्याप नाना पटोले यांचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडने स्वीकारलेला नाही. त्यामुळे नाना पटोले हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत, असं बोललं जातंय. यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे या दिग्गज नेत्यांच्या पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय. (Congress )

महाविकास आघाडीत कॉँग्रेसला किती जागा मिळाल्या?

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. तर, महायुतीने 200 पेक्षा अधिक जागांवर विजयी गुलाल उधळला आहे.

महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. सध्या महायुतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठ्या हालचाली सुरू आहेत. आता मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार तसेच मंत्रीपदाची लॉटरी कोणत्या नेत्यांना लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. (Congress )

News Title –  congress leader nana patole may take a big decision

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?

भाजपला मिळणार सर्वाधिक मंत्रीपदं?, महायुतीचा संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर

पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक धक्का, मनसेचं ‘इंजिन’ धोक्यात?

लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, ‘या’ तारखेला 2100 रुपये मिळणार?, मुख्यमंत्र्यांची घोषणा

RSS कडूनही ग्रीन सिग्नल, महायुतीत देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री?

Join WhatsApp Group

Join Now