MVA | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार आहे. सर्वच पक्ष आता जागांची चाचपाणी करत आहेत. महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये देखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. लोकसभेत राज्यात मविआला मोठं यश मिळालं. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विश्वास वाढला आहे. तर, महायुतीत मात्र अनेक नेते उमेदवारीवरून पक्षापासून विभक्त होत आहे. अजित पवार गट आणि भाजपमधील बऱ्याच नेत्यांनी मविआमध्ये प्रवेश केलाय. काही ठिकाणी उमेदवारीवरून नाराजीनाट्य सुरू असल्याचं चित्र आहे. (MVA)
अशात महाविकास आघाडीच्या एका बड्या नेत्याने राज्यात पुन्हा मविआ सरकार येणार आहे.महाविकास आघाडी 180 जागा जिंकणार, असा दावा केला आहे. मविआ 288 पैकी 180 जागा जिंकेल, असा विश्वास कॉँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे.
बाळासाहेब थोरात यांचा दावा
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.मविआच्या जागा वाटपाच्या चर्चा अनंत चतुर्दशी नंतर पुन्हा सुरु होतील, असं ते म्हणाले. तसेच मविआची प्रचार मोहीम कशी असेल याबाबतचा निर्णय देखील त्यानंतर घेण्यात येईल, असं थोरात यांनी सांगितलं. (MVA)
मविआच्या जागा वाटपाच्या आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या आहेत. गणेशोत्सव असल्याने जागा वाटपच्या चर्चा सध्या थांबलेल्या आहेत. अनंत चतुर्दशीनंतर त्या सुरु होतील, असंही थोरात यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी राज्यात तिसऱ्या आघाडीबाबत सुरू असलेल्या चर्चेवर देखील भाष्य केलं. भाजपचं राजकारण असंच आहे, ते थेट लढत नाहीत.मतांचं विभाजन करुन विजय मिळवण्यासाठी ते अशा गोष्टी करतात, असा आरोप थोरात यांनी केला.
महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार?
तसेच महायुतीवर देखील थोरात यांनी टीका केली. “महायुतीमध्ये जागावाटपवरून रस्सीखेच सुरू आहे. अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंय, भाजपचा मित्रपक्षांच्या जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि लोक या सगळ्या गोष्टी बघत आहेत.”, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. दरम्यान लोकसभेत महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकल्या तर महायुतीला 17 जागावर समाधान मानावे लागले. आता विधानसभेला कुणाला किती जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (MVA)
News Title – Congress leader claimed that MVA would return to power
महत्त्वाच्या बातम्या-
“..तर तुझाही आजीसारखाच गेम करू”; भाजप नेत्याची राहुल गांधींना थेट धमकी
ऐन सणा सुदीच्या मुहूर्तावर सोनं महागलं, जाणून घ्या आजचे दर
राज्यात ‘या’ भागांवर गडद ढगांची चादर, पुढील दोन दिवस धो-धो बरसणार!
आज गौरी विसर्जनाच्या दिवशी ‘या’ 5 राशींना देवी करणार धनवान!
‘या’ राशींनी आज सावध राहावे, तुमच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेतला जाऊ शकतो!






