दिलासदायक! कोरोनाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर

On: January 28, 2023 6:39 PM
---Advertisement---

मुंबई | चीनमध्ये पुन्हा कोरोनामुळं(Corona) हाहाकार माजला आहे. त्यामुळं जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी भारतातही कोरोना रूग्णांची संख्या वाढली असल्याचं दिसून आलं होतं.

परंतु नुकतीच कोरोनाबाबत एक दिलासदायक माहिती समोर आली आहे. भारतातील मागच्या एका दिवसातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहता, या आकडेवारीत लक्षणीय घट दिसून आली आहे.

मागच्या एका दिवसात देशात केवळ 93 रूग्ण सापडले आहेत. तसेच रूग्ण बरं होण्याचं प्रमाणही 99 टक्के झालं आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मागच्या चोवीस तासांत कोरोनामुळं एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना रूग्णांची संख्या वाढेल अशा चर्चा होत असतानाच ही आकडेवारी समोर आल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात आहे. असं असलं तरीही सर्वांनी आपली योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now