रुग्णांना सर्वात मोठा दिलासा, सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे मंत्रालयातील हेलपाटे वाचणार

On: January 31, 2025 12:07 PM
CM Medical Relief Fund Cell In Every District Collectors Office
---Advertisement---

CM Medical Relief Fund | मुख्यमंत्री सहायता निधीच्या (CM Medical Relief Fund) माध्यमातून राज्यातील (State) अनेक रुग्णांना (Patients) मदत होत असते. आता नागरिकांना लगेच मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या (District) जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. याबाबत 22 जानेवारी रोजी शासन निर्णय (Government Decision) निर्गमित करण्यात आला आहे.

आर्थिक साहाय्य (Financial Assistance) देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक (Relatives) मंत्रालयात (Mantralaya) हेलपाटे मारत असतात. आता जिल्ह्यातच कक्ष होणार असल्याने मंत्रालयात येण्याची गरज नसणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात मिळणार आहे. यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांचा त्रास कमी होणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना मदत दिली जाते. दरम्यान, आता गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही.

आता प्रत्येक जिल्ह्यात कक्ष

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राज्यभरातून अर्ज दाखल होत असतात. मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा’कडून अनेक दुर्धर आजारांवरील (Critical Illness) उपचारांसाठी येणाऱ्या खर्चासाठी रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत (Hospitals) आर्थिक साहाय्य देण्यात येते.

55 लाखांची गरजूंना मदत

‘मुख्यमंत्री सहायता निधी’ कक्षाच्या माध्यमातून नाशिक (Nashik), पुणे (Pune), मुंबईसह (Mumbai) जळगावात (Jalgaon) उपचार यंत्रणा उपलब्ध झाली आहे. त्यापोटी राज्य शासनाने 55 लाखांची मदत केली आहे. तसेच आपत्तीप्रसंगीही (Disaster) आर्थिक मदत देण्यात येते. याअनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. (CM Medical Relief Fund)

कधी व कुठे सुरू होणार कक्ष?

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे. जिल्हाधिकारी कक्षासाठी जागा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. महिन्याभरात कक्ष कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. (CM Medical Relief Fund)

थोडक्यात, रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत मिळावी यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू होणार आहे. यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Title : CM Medical Relief Fund Cell In Every District Collectors Office  

 

Join WhatsApp Group

Join Now