मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

On: November 26, 2024 11:53 AM
CM Eknath Shinde Resign
---Advertisement---

CM Eknath Shinde Resign l विधानसभा निवडणुकीचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागला असल्याने राज्यात आता पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. परंतु, आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे.

सत्तास्थापनेच्या हालचलींना मोठ्या प्रमाणात वेग :

आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल 230 जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. तर राज्यात महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागा मिळाल्याने त्यांना समाधान मानावे लागले आहे.

यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसला 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तसेच अपक्ष व इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार हे मात्र निश्चित झाले आहे.

CM Eknath Shinde Resign l राजभवनात नेमकं काय घडलं? :

विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले होते. यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची देखील भेट घेतली आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे पत्र सोपवलं आहे. मात्र यावेळी महायुतीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा देखील करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title – CM Eknath Shinde Resign

महत्वाच्या बातम्या-

नागराज मंजुळेंच्या अडचणीत मोठी वाढ; नेमकं काय प्रकरण?

गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर

राज्याला मिळणार ओबीसी मुख्यमंत्री?, नव्या मागणीची जोरदार चर्चा

पडळकर ते राणे, मंत्रीमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?; वाचा संपूर्ण यादी

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार; कोण होणार पुढील CM?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now