Dhangar Reservation l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धनगड आणि धनगर एकच आहेत असा जीआर काढणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली आहे.
राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार :
पंढरपूर येथे धनगर समाजाच्यावतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढण्यासाठी मुमुख्यमंत्र्यांनी आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक आज पार पडली. यादरम्यान धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली होती. तसेच यासंदर्भात धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय दिखील बैठकी दरम्यान घेण्यात आला आहे. तसेच या बैठकीनंतर उपोषण मागे घेणार असल्याचं शिष्टमंडळाने आश्वासन दिलं आहे.
यादरम्यान राज्य सरकारकडून धनगर आणि धनगड हे एकच आहे असा जीआर लवकरच काढला जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र हा जीआर कायद्याच्या कसोटीवर म्हणजेच न्यायालयात टिकला पाहिजे, त्यासाठी जीआरचा मसुदा तयार करण्याचं काम लवकरच केलं जाणार आहे. तसेच यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकारी व सखल धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती देखील स्थापन केली जाणार आहे.
Dhangar Reservation l शुंभूराज देसाई काय म्हणाले? :
यासंदर्भात राज्य सरकारकडून नेमली जाणारी समिती पुढील चार दिवसांत जीआरचा मसुदा तयार करण्याचं काम करणार आहे. त्यानंतर राज्याच्या महाधिवक्त्यांचं देखील यासंदर्भात महत्वाचं मत घेतलं जाईल असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीदरम्यान घेतला आहे.
याप्रकरणी उत्पादन शुल्क मंत्री शुंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, धनगर आणि धनगड हे दोन्हीही एकच आहेत असा स्वतंत्र जीआर राज्य सरकारने काढावा अशी मागणी धनगर समाजाने केली होती. मात्र आता तसा जीआर देखील काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
News Title- CM eknath shinde annoused dhangar dhangad is in same caste
महत्वाच्या बातम्या-
UPI व्यवहाराची मर्यादा वाढली; एका दिवसात ‘इतके’ पैसे ट्रान्सफर होणार
ऐश्वर्याने काढली वेडिंग रिंग, अभिषेकपासून घेतली फारकत?; व्हिडिओच आला समोर
पंजाबराव डख यांचा पावसाबद्दल महत्वाचा अंदाज, शेतकऱ्यांनाही दिला सल्ला
धनगर आरक्षणाबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!
गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर






