Devendra Fadnavis | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्या. यामुळे आगामी काळात मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या निर्णयामुळे ओबीसी समाजात संताप उसळला आहे. नागपूरमध्ये ओबीसी बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली असून आंदोलन वेग घेत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. (Maratha reservation)
मुख्यमंत्री फडणवीसांची भेट ठरली :
नागपूरमधील उपोषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली आहे. उद्या (गुरुवारी) ते आंदोलकांची भेट घेणार असून ओबीसी नेते तायवाडे यांच्यासोबत चर्चेला बसणार आहेत.
या चर्चेतून सरकारचा पुढील मार्ग आणि ओबीसींच्या नाराजीवर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारकडून हालचालींना वेग आला असला तरी, ओबीसी समाजाने विरोधाची भूमिका अधिक ठाम केली आहे.
Devendra Fadnavis | प्रकाश शेंडगे यांचा इशारा :
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash shendage) यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलं की, “मराठा आरक्षणासाठी घेतलेला जीआर ओबीसींच्या ताटातलं आरक्षण कमी करणारा आहे. याला आमचा ठाम विरोध आहे. आज आमची बैठक असून, राज्यव्यापी आंदोलन उभारण्यावर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर पुढील कायदेशीर लढाईही आम्ही कोर्टात लढणार आहोत. ओबीसी हा राज्यातील सर्वात मोठा समाज असून त्यांच्यावर अन्याय सहन केला जाणार नाही.”
पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman hake) यांनी थेट मराठा आरक्षणाचा जीआर फाडून निषेध नोंदवला. त्यांनी आरोप केला की, “हा जीआर संविधानविरोधी आहे. न्यायालयाच्या निर्णयांचा अवमान करणारा आहे. बनावट प्रमाणपत्र घेणाऱ्यांना अभय देण्याचं काम सरकार करत आहे. त्यामुळे ओबीसींचं आरक्षण उद्ध्वस्त होत आहे.”






