छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन रिंगरोड करणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

On: April 28, 2025 6:57 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीला जोडणारा इंडस्ट्रिअल रिंग रोड उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी ही ग्वाही दिली.

कनेक्टिव्हिटीला मिळणार बूस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) आणि संभाजीनगर-पुणे ग्रीन फील्ड रोडनंतर आता वाढवण पोर्टला जोडणारा ॲक्सेस कंट्रोल रोड तयार होत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील कंटेनर केवळ ७ ते ८ तासांत पोर्टवर पोहोचू शकतील. या कनेक्टिव्हिटीला आणखी बळ देण्यासाठी शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीला जोडणे आवश्यक आहे.

या इंडस्ट्रिअल रिंग रोडचा निर्णय २०१८ मध्येच घेण्यात आला होता, मात्र काही कारणास्तव तो रखडला होता. आता हा मार्ग निश्चितपणे पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी (CM) केली. हा सोहळा रविवारी एमआयटी कॉलेजच्या (MIT College) मंथन हॉलमध्ये पार पडला. यावेळी मंत्री अतुल सावे (Atul Save), उद्योजक अनुराग जैन (Anurag Jain), नंदकुमार कागलीवाल (Nandkumar Kagliwal), डॉ. नरेंद्र मैरपाडी, सीएमआयएचे अध्यक्ष अर्पित सावे (Arpit Save), उपाध्यक्ष उत्सव माछर (Utsav Machhar), अथर्वेशराज नंदावत आणि राम भोगले उपस्थित होते.

कौशल्य विकास केंद्र, इतर घोषणा

मुख्यमंत्री म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी डीएमआयसी (DMIC) कॉरिडॉर गेला असला तरी, पहिली स्मार्ट सिटी (Smart City) केवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये साकारली. येथील इको-सिस्टीम, नेटवर्क आणि ऑटो क्लस्टरमुळे हे शक्य झाले. टोयोटा, जेएसडब्ल्यू, अथर यांसारख्या कंपन्यांमुळे शहर ईव्ही कॅपिटल (EV Capital) बनले आहे. भविष्यातील वाढ लक्षात घेऊन ८ हजार एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

सीएमआयएला (CMIA) कौशल्य विकास केंद्र (Skill Development Centre) उभारण्यासाठी ५ एकर जमीन देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच, शेंद्रा-वाळूज फ्लायओव्हर (Shendra-Waluj Flyover) भविष्यात उभारणार असल्याचे ते म्हणाले. जायकवाडीतील (Jaykwadi) तरंगत्या सोलार प्रकल्पासाठी (Floating Solar Project) आणि औट्रम घाट बोगद्यासाठी (Autram Ghat Tunnel) केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सीएमआयए अध्यक्ष अर्पित सावे (Arpit Save) यांनी उद्योजक डीएमआयसीमध्ये (DMIC) १ लाख कोटींची गुंतवणूक करणार असून, ५ लाख रोजगार निर्माण होतील, असे प्रास्ताविकात सांगितले.

News Title : CM Announces Shendra-Bidkin Industrial Ring Road

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now