Yamunotri Flood News | उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांचे हाल सुरू झाले आहेत. विशेषतः यमुनोत्री धाम परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे महाराष्ट्रातील तब्बल 200 पर्यटक अडकले आहेत. यामध्ये 50 पर्यटक मुंबईतील असल्याचे समजते. सध्या यमुनोत्री मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला असून, रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे.
हिमाचल आणि उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे वाहने नदीत वाहून गेली असून, काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही घरं जमीनदोस्त झाली आहेत. संपूर्ण परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. (Yamunotri Flood News)
600 हून अधिक पर्यटक अडकले, यमुनोत्री रस्ता बंद :
यमुनोत्री परिसरात सतत मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे 600 हून अधिक पर्यटक विविध ठिकाणी अडकले आहेत. त्यापैकी 200 जण महाराष्ट्रातून गेलेले आहेत. पावसाचा जोर एवढा आहे की, रस्ते खचले असून, काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे मार्ग अवरुद्ध झाले आहेत.
प्रशासनाने यमुनोत्री धामचा रस्ता तात्काळ बंद केला असून, हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या अडकलेल्या पर्यटकांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला असल्याने बचाव कार्य अधिक आव्हानात्मक बनले आहे.
Yamunotri Flood News | रेस्क्यू ऑपरेशन सुरू, मुंबईच्या 50 पर्यटकांचा समावेश :
प्राथमिक माहितीनुसार, अडकलेल्या महाराष्ट्रातील 200 पर्यटकांपैकी 50 पर्यटक मुंबईतील असल्याचे समोर आले आहे. उर्वरित पर्यटक कोणत्या जिल्ह्यातील आहेत, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली असून, हेलिकॉप्टरच्या सहाय्यानेही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Yamunotri Flood News)
राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणा सतर्क असून, पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबवल्या जात आहेत. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना यात्रेसाठी पुढील सूचना येईपर्यंत प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे.






