सिंहगड रोड परिसरातील नागरिकांनो सावधान! गाडी थांबवणारांपासून सतर्क राहा!

On: January 23, 2025 2:50 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुणेकरांनो, विशेषतः नांदेड सिटी (Nanded City, Pune) नांदेड गाव(Nanded, Pune), किरकिटवाडी (Kirkitwadi), शिवणे (Shivane), कोंढवे-धावडे, धायरी (Dhayari), डीएसके विश्व, सिंहगड रोड (Sinhagad Road) आणि उत्तरनगर (Uttamnagar) परिसरातील नागरिकांनो, अत्यंत सावध राहा! डीएसके रोड (DSK Vishwa Road) ते रायकर मळा (Raikar Mala) परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.

Varpe Clinic

मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण मुले रहदारीच्या रस्त्यावर गाड्या थांबवत आहेत. “माझ्या घरी मेडिकल इमरजन्सी आहे” असे भावनिक आवाहन करून ते गाडीत बसतात. त्यानंतर गाडी घराकडे घेण्यास सांगून निर्जनस्थळी नेतात.

एकदा का गाडी सुनसान ठिकाणी पोहोचली की, हे तरुण गाडीतील व्यक्तींना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे, पर्स, मोबाईल, पाकीट आणि इतर मौल्यवान वस्तू लुटून नेतात.

गेल्या आठवड्यात अशा प्रकारच्या तीन घटना घडल्याचे समोर आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, पुणेकरांनी, विशेषत: वर उल्लेख केलेल्या भागातील नागरिकांनी, सतर्क राहणे गरजेचे आहे.

Pune News l नागरिकांना आवाहन:

-अनोळखी व्यक्तींना, विशेषत: लहान मुलांना, कितीही गरज असली तरी गाडीत बसवू नका.

-“मेडिकल इमरजन्सी”च्या नावाखाली कोणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केल्यास, गाडी न थांबवता पुढे जा.

-शक्यतो एकट्याने प्रवास करणे टाळा.

-रात्रीच्या वेळी प्रवास करताना अधिक सतर्क राहा.

-अशा प्रकारची घटना घडल्यास त्वरित पोलिसांना कळवा.

नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी सतर्क राहावे आणि अनोळखी व्यक्तींपासून सावधगिरी बाळगावी.

News Title : Citizens of Sinhagad Road area beware

Varpe Clinic Nanded City Pune

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now