CIDCO Lottery 2025 | नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. CIDCO (सिडको) कडून यंदा तब्बल 22,000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी पूर्ण झाली आहे. नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर ही गृहयोजना जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सिडको लॉटरीचा मुहूर्त ठरला :
यंदाची सिडको लॉटरी सुरुवातीला जून-जुलै, नंतर 15 ऑगस्ट आणि नंतर गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर जाहीर होईल अशी चर्चा होती. मात्र आता विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीच्या मुहूर्तावर लॉटरीची सोडत काढली जाणार आहे. सिडकोने यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण केली असून लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
कुठे मिळणार घरे? :
या लॉटरीतील घरे नवी मुंबई आणि पनवेलमधील महत्त्वाच्या नोड्समध्ये असतील.
वाशी
जुईनगर
खारघर
तळोजा
द्रोणागिरी
या भागांतील सिडको प्रकल्पांमध्ये घरांची उपलब्धता असेल. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर घरांची संख्या, किंमती आणि अचूक ठिकाण याबाबत स्पष्टता येईल.
CIDCO Lottery 2025 | घरांच्या किमतीत कपातीची शक्यता :
सिडकोच्या घरांच्या किमती जास्त असल्याने अनेक नागरिकांनी मागील काही लॉटऱ्यांमध्ये पाठ फिरवली होती. त्यामुळेच नगरविकास विभागाने घरांच्या किंमती कमी करण्याबाबत विशेष बैठक बोलावली आहे.
घरांच्या किंमतीत कपात होण्याची दाट शक्यता असल्याने या लॉटरीबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.






