CIDCO House Lottery | मुंबई आणि उपनगरांमध्ये स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करणं हे आजच्या काळात सामान्य माणसासाठी अतिशय कठीण झालं आहे. कारण घरांच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे कित्येकांना प्रयत्न करूनही स्वत:चं घर घेता आलेलं नाही. मात्र आता हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार असून त्यातून घरांच्या किमती कमी होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. (CIDCO House Lottery)
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक :
सिडकोच्या घरांच्या किंमतीबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा होईल.
जर हा निर्णय झाला तर सिडको प्रशासन नवी मुंबईत मोठी “जम्बो लॉटरी” काढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हजारो लोकांना स्वस्तात हक्काचे घर मिळू शकते.
CIDCO House Lottery | सिडको अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे विधान :
सिडकोमध्ये २५ लाख रुपयांपर्यंतची घरे उपलब्ध असून बाजारभावाच्या तुलनेत ती कमी किमतीत आहेत. खासगी बिल्डरच्या तुलनेत सिडकोची घरे दर्जेदार आहेत, असे सिडकोच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, “सरकारने घरांच्या किमतीबाबत तोडगा काढल्यास आमची लॉटरी काढण्याची पूर्ण तयारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले आहे. (CIDCO House Lottery)
या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष सरकारच्या बैठकीकडे लागले आहे. निर्णय झाला तर लवकरच महालॉटरीची घोषणा होईल आणि अनेक वर्षांपासून हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांचे स्वप्न साकार होईल. त्यामुळे ही महत्त्वाची घोषणा नेमकी कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






