नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किंमती जाहीर!

On: January 8, 2025 2:40 PM
Cidco Homes Price
---Advertisement---

Cidco Homes Price l कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या सिडकोच्या घरांच्या किंमती अखेर जाहीर झाल्या आहेत. अशातच आता नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच सिडकोच्या एकूण 26 हजार घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी आत्तापर्यंत तब्ब्ल एक लाखाहून अधिक अर्ज देखील सादर करण्यात येणार आहेत. मात्र आता त्या घरांच्या किमती जाहीर झाल्यामुळे सर्वांना अर्जाची वाट पाहावी लागणार आहे.

सिडकोच्या घरांच्या किंमती जाहीर :

सिडकोच्या घरांच्या किंमती जाहीर झाली असल्याने सिडकोची ही तब्ब्ल २६ हजार घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (वार्षिक उत्पन्न हे ६ लाखांपर्यंत) व अल्प उत्पन्न गटाकरता (वर्षिक उत्पन्न हे ६ लाखांपेक्षा जास्त) तसेच नवी मुंबईच्या वाशी, खारकोपर, खारघर, बामणडोंगरी, तळोजा, खांदेश्वर, पनवेल, मानसरोवर आणि कळंबोली नोड परिसरात उपलब्ध आहेत.

याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठीच्या घरांच्या किंमती या २५ लाखांपासून तब्ब्ल ४८ लाखांपर्यंत असतील. तसेच अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांच्या किंमती या ३४ लाख ते ९७ लाखांच्या दरम्यान असणार आहेत. तर आता आपण पाहुयात घरांच्या किंमती काय असणार?

Cidco Homes Price l आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गट (EWS) :

खारघर बस डेपो – ४८.३ लाख
बामनडोंगरी – ३१.९ लाख
खारकोपर २ए, २बी – ३८.६ लाख
तळोजा सेक्टर ३९ – २६.१ लाख
तळोजा सेक्टर २८ – २५.१ लाख
कळंबोली बस डेपो – ४१.९ लाख

अल्प उत्पन्न घटक गट (LIG) :

पनवेल बस टर्मिनस – ४५.१ लाख
तळोजा सेक्टर ३७ – ३४.२ लाख ते ४६.४ लाख
मानसरोवर रेल्वे स्थानक – ४१.९ लाख
खारघर बस डेपो – ४८.३ लाख
खांदेश्वर रेल्वे स्थानक – ४६.७ लाख
खारकोपर पूर्व – ४०.३ लाख
खारघर स्थानक सेक्टर १ए – ९७.२ लाख
वाशी ट्रक टर्मिनल – ७४.१ लाख

News Title – Cidco Homes Price News

महत्त्वाच्या बातम्या –

पुण्याला मिळणार 4 वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ मार्गांवर धावणार

बीड पुन्हा हादरलं! ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह

राज्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ लोकांना सर्वाधिक धोका

कोल्हापूर हादरलं! भाचीच्या लग्नात मामाने जेवणात टाकलं विष अन् अख्ख गाव…

जाणून घ्या पुढील 10 दिवस राज्यातील हवामान कसं असणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now