CID फेम अभिनेत्रीला मारहाण; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

On: October 17, 2025 7:35 PM
CID Actress Vaishnavi Dhanraj
---Advertisement---

CID Actress Vaishnavi Dhanraj | ‘सीआयडी’ (CID) या लोकप्रिय मालिकेत इन्स्पेक्टर ताशाची (Inspector Tasha) भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैष्णवी धनराज (Vaishnavi Dhanraj) पडद्यावर जितकी कणखर दिसली, तिचे वैयक्तिक आयुष्य तितकेच वेदनादायी आणि संघर्षाचे राहिले आहे. व्यावसायिक जीवनात यश मिळवणाऱ्या वैष्णवीला तिच्याच आई-भावाने आणि पतीने केलेल्या अत्याचारांमुळे नरकयातना भोगाव्या लागल्या.

पतीकडून अमानुष मारहाण :

वैष्णवीने २०१६ साली तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि अभिनेता नितीन सेहरावतवर (Nitin Sehrawat) घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले होते. एका मुलाखतीत तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगताना म्हटले होते, “मी घरगुती हिंसाचाराची शिकार झाली होती. (CID Actress Vaishnavi Dhanraj)

एका सकाळी त्याने मला इतके मारले की माझ्या पायातून रक्त वाहू लागले होते. तो दिवस त्याची पत्नी म्हणून माझा शेवटचा दिवस होता. मी घरातून पळ काढला आणि त्यानंतर घटस्फोट घेतला.” मात्र, तिचा पती नितीनने हे सर्व आरोप फेटाळून लावत, वैष्णवी प्रसिद्धीसाठी हे सर्व करत असल्याचे म्हटले होते.

CID Actress Vaishnavi Dhanraj | मालमत्तेसाठी आई आणि भावाकडून छळ :

पतीच्या त्रासातून सुटका झाल्यानंतर वैष्णवीला तिच्याच रक्ताच्या नात्यांकडून मोठा धक्का बसला. २०२३ मध्ये तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मदतीची याचना केली होती. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या शरीरावरील जखमांचे व्रण दाखवत, मालमत्तेच्या लोभापायी आई आणि भावाने आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला होता. तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर मारहाणीचे निशाण स्पष्ट दिसत होते. (CID Actress Vaishnavi Dhanraj)

एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिचा भाऊ गेल्या १० वर्षांपासून तिला त्रास देत होता. तो तिच्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून होता आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायचा. इतकेच नाही, तर त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती, असा धक्कादायक खुलासा वैष्णवीने केला होता. या कौटुंबिक कलहामुळे वैष्णवी गेल्या काही काळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla Telly (@pinkvillatelly)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishnavi Dhanraj (@vaishnavidhanraj)

News title : CID Actress Vaishnavi’s Painful Life

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now