‘आमच्या नादी लागू नका’; घनश्याम दरोडेचा पाकिस्तानला सज्जड दम

On: May 10, 2025 12:48 PM
---Advertisement---

Ghanshyam Darode | भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून प्रतिक्रिया येत आहेत. भारताने पाकिस्तानच्या कुरापतींना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे सत्र सुरूच ठेवले असून, याबद्दल अनेक नेते आणि सामान्य नागरिक भारताच्या  कणखर भूमिकेची प्रशंसा करत आहेत. याच मालिकेत, ‘छोटा पुढारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनश्याम दरोडे (Ghanshyam Darode) याने एका युट्युब चॅनेलला (YouTube Channel) दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानवर (Pakistan) जोरदार शब्दांत टीका केली आहे.

घनश्याम दरोडेचे पाकिस्तानला आव्हान

घनश्याम दरोडे याने आपल्या मुलाखतीत पाकिस्तानला थेट शब्दांत इशारा दिला. तो म्हणाला, “आमच्या नादी लागू नका. तुम्ही का भारताच्या नादी लागताय? भारत देशाने आणि पंतप्रधान मोदी (Narendra Modi) साहेबांनी जर ठरवलं, तर तुम्हाला तुमच्या घरात येऊन धडा शिकवायला अर्धा ताससुद्धा लागणार नाही.” त्याच्या या वक्तव्याची सध्या समाजमाध्यमांवर (Social Media) आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

“आपल्या निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याचे दुःख आहे, परंतु पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांची जागा दाखवली, हे पाहून खूप बरे वाटत आहे,” अशा शब्दांत त्याने मोदी सरकारच्या (Government of India) कारवाईचे कौतुक केले. तो पुढे म्हणाला, “युद्ध झाले तरी, आपण इतिहास पाहिला आहे, आपल्याला काही फरक पडत नाही. पाकिस्ताननेच या संघर्षाला सुरुवात केली. सिंधू (Indus) खोऱ्यातील पाणी आपण तोडले आहे. पाकिस्तानने निष्पाप लोकांचा जीव घेतला, याचे मनापासून दुःख आहे. त्यांच्यात धमक नसतानाही त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या लोकांना मारले. त्याचाही बदला घेण्याचे काम भारत करत आहे.”

“तुमच्यात तेवढी धमक नाही”

घनश्याम दरोडे (Ghanshyam Darode) याने एक भारतीय नागरिक म्हणून पंतप्रधान मोदींना आवाहन केले की, “पाकिस्तानला (Pakistan) अजिबात सुट्टी देऊ नका. त्यांच्या घरात घुसून त्यांना धडा शिकवा. आम्ही जर तुमच्या नादी लागलो, तर एकही शिल्लक राहणार नाही. मी समजुतीचा इशारा देत आहे… तुम्ही कितीही वळवळ केली तरी आमच्यापुढे टिकू शकणार नाहीत. तुमच्यात तेवढी धमक नाही.”

“कोणीही उठतो आणि सिंधू (Indus) खोऱ्यात रक्ताचे पाट वाहतील, अशा धमक्या देतो. तुम्हाला काहीतरी समजायला हवे. बघूया कोण कोणाचा श्वास रोखतो. यांना पाणी नाही, आता अन्नधान्यही बंद करायला हवे. एका रात्रीत पाकिस्तान (Pakistan) नकाशावरून गायब होईल,” असा खणखणीत इशारा घनश्याम दरोडे (याने दिला आहे. त्याच्या या थेट आणि आक्रमक भूमिकेमुळे अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे, तर काहींनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

Title : Chhota Pudhari Ghanshyam Darode Warns Pakistan Firmly

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now