छावा सिनेमामुळे चमकले विकी कौशलचे स्टार, पहिल्याच दिवशी करुन दाखवली ‘ही’ कमाल!

On: February 15, 2025 7:31 PM
Chhava Cinema
---Advertisement---

Chhava Cinema | बॉलीवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या आपल्या नवीन चित्रपट ‘छावा’ (Chhava) मुळे चर्चेत आहेत. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या ऐतिहासिक भूमिकेत विकी कौशल प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. चित्रपटाला प्रचंड उत्तम ओपनिंग मिळाली असून, विकी कौशलच्या कारकिर्दीतील हा पहिला डबल डिजिट ओपनर ठरला आहे.

‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर विक्रम केला!

मेकर्सच्या माहितीनुसार, ‘छावा’ने पहिल्याच दिवशी भारतात 33.1 कोटींची कमाई केली आहे, तर वर्ल्डवाइड 50 कोटींचा टप्पा गाठला आहे. हा विकी कौशलच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग कलेक्शन असलेला चित्रपट ठरला आहे.

यापूर्वी विकीच्या ‘बैड न्यूज’ (8.62 कोटी), ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ (8.20 कोटी) आणि ‘राजी’ (7.53 कोटी) यांसारख्या चित्रपटांना चांगली ओपनिंग मिळाली होती, पण ‘छावा’ने या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे.

विकीचे सर्वाधिक ओपनिंग मिळवलेले चित्रपटं-

छावा (2024) – 33.1 कोटी
बैड न्यूज (2024) – 8.62 कोटी
उरी: द सर्जिकल स्ट्राइक (2019) – 8.20 कोटी
राजी (2018) – 7.53 कोटी
सॅम बहादूर (2023) – 6.25 कोटी

‘छावा’ विकीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी फिल्म ठरणार?

विकी कौशलने 2015 मध्ये ‘मसान’ (Masaan) या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक सुपरहिट चित्रपट दिले, पण ‘छावा’च्या दमदार यशामुळे आता हा चित्रपट विकीच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट ठरू शकतो.

‘छावा’चे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी केले असून, विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत आहे. पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, हा चित्रपट लंबी रेस का घोडा ठरु शकतो.

English Title: Chhava Becomes Vicky Kaushal’s Biggest Opening Film Ever

बॉक्स ऑफीसवर छावा चित्रपटाची कमाल; पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

 

शाहिदसोबत प्रियंकाने ‘तो’ सीन केला पण माझ्यासोबत… ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याचा खुलासा

 

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now