पोकळ नेते उघडे पडतातच!; शिवरायांचा पुतळा कोसळ्याने किरण माने संतापले

On: August 27, 2024 3:06 PM
Chhatrapati Shivaji Maharaj
---Advertisement---

Chhatrapati Shivaji Maharaj l सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर एक वाईट घटना घडली आहे. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा काल जमिनीवर कोसळला. यामुळे राज्यातील शिवप्रेमी हे प्रचंड संतापले आहेत. तसेच या घटनेमुळे राज्यातील शिवप्रेमी, राजकीय विरोधकांनी व सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार किरण माने यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.

किरण मानेंची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल :

गेल्या आठ महिन्यापूर्वी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तब्बल 35 फुटी पुतळा उभारण्यात आला होता. त्यावेळी 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाचे औचित्य साधत पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण देखील करण्यात आले. मात्र काल म्हणजेच सोमवारी 26 ऑगस्ट रोजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमिनीवर कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या घटनेवर सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. यादरम्यान अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे. यावेळी त्यांनी फेसबुकवर लिहले की, घाईघाईत पोकळ कामं करून व फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते कधी ना कधी हे उघडे पडतातच असा सणसणीत टोला किरण माने यांनी सरकारला लगावला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj l किरण माने नेमके काय म्हणाले? :

अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुंदर व चित्ताकर्षक पुतळा आहे, त्याला येत्या नोव्हेंबर मध्ये 67 वर्ष पूर्ण होणार आहेत. तसेच गेली सात दशकं तब्बल 120 च्या वेगाने येणारे वारे झेलत हा पुतळा आज देखील दिमाखात उभा आहे! या पुतळ्याचं उद्घाटन भारताचे अत्यंत बुद्धीमान पंतप्रधान राहिलेले पं. जवाहरलाल नेहरू यांनी केलं होत. त्यावेळी तब्बल 2 वर्ष युद्धपातळीवर हालचाली करून हे स्मारक त्यावेळी उभं राहिलं.

मात्र आता पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कोसळला आहे. तसेच हा पुतळा एवढा जुनाही नाही की नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला तयार केलेला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेला हा पुतळा काही दहा वर्षांपुर्वीचा नाही, तर अगदी इलेक्शनच्या चारपाच महिने आधी तयार केलेला हा पुतळा आहे. तरी देखील अशी दुर्घटना घडते असं मतं किरण मानेंनीबोलून दाखवलं आहे.

News Title : Chhatrapati Shivaji Maharaj statue Kiran Mane Post

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीकृष्णाची पूजा करताना अंकिता लोखंडेकडून चूक, नेटकरी भडकले!

मंकीपॉक्स टेस्ट करणं झालं सोपं; अवघ्या ‘इतक्या’ वेळात होणार टेस्ट

अत्यंत भयंकर! तरूणीसोबत घडलेल्या घटनेनं पुणे हादरलं

रोज सकाळी फक्त 1 किलोमीटर चालल्याने किती कॅलरिज बर्न होतात?

निक्कीच्या ‘त्या’ वागण्यामुळे अरबाजने घरात केली तोडफोड; बिग बॉस काय करणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now