छत्रपती शाहू महाराजांचे हैदराबाद गॅझेटवर परखड मत; मनोज जरांगेंना मोठा धक्का?

On: October 3, 2025 9:19 AM
Maratha Reservation
---Advertisement---

Maratha Reservation | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले होते. मुंबईत झालेल्या या उपोषणात लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते, ज्यामुळे सरकारला याची दखल घ्यावी लागली आणि आंदोलनाला मोठे यश मिळाले. या आंदोलनादरम्यान ‘हैदराबाद गॅझेट’ (Hyderabad Gazette) लागू करण्याची जरांगे पाटील यांची मुख्य मागणी सरकारने मान्य केली होती.

याच पार्श्वभूमीवर, आता छत्रपती घराण्याचे वंशज आणि काँग्रेसचे खासदार शाहू महाराज (chhatrapati shahu maharaj) यांनी हैदराबाद गॅझेटबद्दल एक मोठे आणि चर्चेला उधाण आणणारे वक्तव्य केले आहे.

शाहू महाराज नेमके काय म्हणाले? :

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नांमध्ये १९०२ च्या आरक्षण आदेशाचा उल्लेख कुठेही होत नाही, हे दुर्दैव आहे. हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) हे निजामाने केलेलं गॅझेट आहे. ज्या निजामाला आपण तीन वेळा हरवलं, त्या निजामाचं गॅझेट आपण का स्वीकारतोय? हे मला कळत नाही. मराठा आरक्षणामध्ये अजून योग्य पर्याय आणि योग्य मार्ग निघालेला नाही, असं मोठं विधान शाहू महाराज यांनी यावेळी केलं आहे.

मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट (Kolhapur Gazette) लागू करण्याच्या आंदोलनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे, कोल्हापुरातील भवानी मंडपात कोल्हापूर गॅझेटचं आणि पेनाचे पूजन करून या आंदोलनाला सुरुवात झाली. काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती (chhatrapati shahu maharaj) आणि इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली, यावेळी बोलताना शाहू महाराज यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे.

Maratha Reservation  | आरक्षणाचा योग्य मार्ग अजूनही अस्पष्ट :

कोल्हापुरात ‘कोल्हापूर गॅझेट’ लागू करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाच्या वेळी बोलताना शाहू महाराजांनी आपले मत स्पष्ट केले. काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती आणि इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील भवानी मंडपात या आंदोलनाला सुरुवात झाली.

शाहू महाराजांनी स्पष्ट केले की, भारताने लोकशाही स्वीकारली आहे आणि त्यामुळे आपल्याला संविधानाच्या चौकटीतूनच पुढे जावे लागेल. संविधानातील अडथळे दूर केले तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल. मराठा आरक्षणामध्ये अजून योग्य पर्याय आणि योग्य मार्ग निघालेला नाही. (chhatrapati shahu maharaj statement on maratha reservation)

तसेच, मराठा समाज मागासलेला आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झाले आहे आणि मराठा व कुणबी एकच आहेत, हे आपण गेली दोन वर्षे सांगत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षण देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आरक्षणातून मिळणाऱ्या नोकरीवर अवलंबून न राहता, पुढे जाण्यासाठी इतर मार्गही स्वीकारले पाहिजेत, असेही ते म्हणाले. शाहू महाराजांच्या या वक्तव्यामुळे, निजामशाहीतील गॅझेट स्वीकारण्यावर मराठा समाजात आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

News title : chhatrapati shahu maharaj big statment on maratha reservation

Join WhatsApp Group

Join Now