Chh. Sambhajinagar–Paithan Highway closed | छत्रपती संभाजीनगर ते पैठण (Paithan) (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752) या मार्गावर चालणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आहे. या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सध्या बिडकीनजवळील निलजगाव फाटा परिसरात काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे 4 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान या भागातील वाहतूक तात्पुरती वळवण्यात येणार आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. (Chh. Sambhajinagar–Paithan Highway closed)
बंद राहणारा मार्ग :
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी नागरिकांना मार्ग बदलून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि काम सुरळीत पार पडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रशासनाने यासंबंधीची तयारी पूर्ण केली आहे.
कचनेर – निलजगाव – बिडकीन डीएमआयसी – निलजगाव फाटा – बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
Chh. Sambhajinagar–Paithan Highway closed | पर्यायी मार्ग :
छत्रपती संभाजीनगरहून वाळूज, कचनेर किंवा पैठणकडे जाणारी वाहने आणि त्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग सुचवले आहेत. या मार्गांवर वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती दिशा फलकांची व नियंत्रण यंत्रणेची व्यवस्था केली आहे. (Chh. Sambhajinagar–Paithan Highway closed)
या वाहतूक बदलांमुळे प्रवासात काहीसा वेळ अधिक लागू शकतो, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा लाभ मिळणार आहे. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






