Pune News : गेल्या काही दिवसांपूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील एक घटना समोर आली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पिंपरी चिंचवडमध्ये उभारला जात असलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला उभारणी आधीच तडे गेल्याची घटना घडली आहे.
महाराजांचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल 100 फुटी पुतळा उभारला जात आहे. मात्र हा पुतळा उभारण्यापूर्वी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.
महाराजांच्या या पुतळ्यासाठी महापालिका एकूण 47 कोटींचा खर्च करणार आहे. कारण दिल्लीमध्ये या पुतळा साकारून या पुतळ्याचे पार्ट पिंपरीत आणले जात आहेत. हा पुतळा प्रत्यक्षात 2025 मध्ये उभाराला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच महाराजांच्या पुतळ्याला तडा गेल्यानं हे काम निकृष्ट दर्जाचे आहे का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जातोय.
Pune News : महापालिकेनं दिलं स्पष्टीकरण :
मात्र याबाबत महापालिकेनं स्पष्टीकरण दिलं आहे. आत्ताच असा निष्कर्ष काढणं हे चुकीचं आहे असं पालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शंभू सृष्टी ही लवकरच उभारली जााणार आहे. या शंभू सृष्टीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल 100 फूट उंच पुतळा कास्य धातूमध्ये उभा केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र, हा पुतळा ज्या पायावर उभारला जाणार आहे त्या पायांनाच तडे गेले आहेत. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर जास्त प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
News Title : Chhatrapati Sambhaji Maharaj statue
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार
… तर यापुढे अहमदनगर नव्हे तर ‘अहिल्यानगर’; नामांतरास ग्रीन सिग्नल
टाटा कंपनीची भन्नाट कार बाजारात लाँच; किंमत असणार फक्त…
रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 11 हजारांहून अधिक जागांवर होणार भरती, असा करा अर्ज
“फोटोंना काय जोडे मारता, हिम्मत असेल तर समोर येऊन..”; अजित पवारांचं थेट आव्हान






