“या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र…”, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

On: November 3, 2024 3:32 PM
chhagan bhujbal
---Advertisement---

Chhagan Bhujbal | संपूर्ण जगभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना पहायला मिळत आहे. मात्र, या वर्षीची दिवाळी चांगलीच चर्चेत राहिली. या मागचं कारण म्हणजे पवारांच्या बारमतीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाडवा साजरा करण्यात आला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले.

त्यामुळे आधी राजकारणात फुट आणि आता कुटुंबात फुट अशा प्रकराचं चित्र दिसत आहे. दरम्यान, या वर्षी बारामतीमध्ये वेगवेगळा पाडवा साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले भुजबळ?

माध्यमांशी बोलत असताना, भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. या निवडणुकीनंतर पवार कुटुंबीयांनी एकत्रित आलं पाहिजे. त्यांच्या राजकीय पक्ष, शिवाय राजकीय विचारसरणी याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये.

कुटुंब म्हणून त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं भुजबळ म्हणाले. पुढे ते म्हणाले की, त्यांच्या विधानांवरुन काळजी करण्याचं कारण नाही. शरद पवार हे कुटुंब तुटू देणार नाहीत. कुटुंब एकत्र राहिलं, तर आपल्यालाही आनंद होईल. सगळ्यांच्या घरात आनंद राहिला तर आपल्यालाही आनंद होतो.

पुतण्याचं डीएनए सारखाच-

यावेळी बोलत असताना समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढणार असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. यावर भुजबळ म्हणाले की, मला वाटतंय की, सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे. शरद पवारांचा पुतण्या, अजितदादांचा पुतण्या, पूर्वी मुंडे साहेबांचा पुतण्या,  बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या. असे अनेक पुतणे आहेत ते काकांचं ऐकतातच असं वाटत नाही. राजकारणात सगळे पुतणेच आहेत. त्यांचा वेगळाच डीएनए आहे असं वाटायला लागलं आहे.

News Title : chhagan bhujbal on sharad pawar and family

महत्त्वाच्या बातम्या-

‘…नाहीतर तुमचा बाबा सिद्दीकी करु’, मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीमुळे खळबळ

बारामतीत अजित पवारांना धक्का बसणार?; ‘या’ बड्या नेत्याचं भाकीत

मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; ‘या’ मतदारसंघांमधून निवडणूक लढणार

‘अजित पवार मर्दाची औलाद असते तर…’; जितेंद्र आव्हाड भडकले

‘आमची विचारधारा सेम’; ‘या’ व्हिडीओमुळे पार्थ पवार होतायेत ट्रोल

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now