“…तर आम्ही उपकार विसरणार नाही”, भुजबळांनी मनोज जरांगेंना केली ‘ही’ विनंती

On: February 7, 2024 10:39 AM
Manoj Jarange
---Advertisement---

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एका बाजूला मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सराकारकडे मराठा आरक्षणाची मागणी केली. तर मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत मागणी केली. याला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. यासोबत आता भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना उपकाराची भाषा केली आहे.

अहमदनगरच्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्या. तसेच  त्यांनी नाभिक समाज आणि मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यभरातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केल्या होत्या. यावर जरांगे यांनी भुजबळांनी आधी सरपंच व्हावं, असा टोला लगावला आहे. यानंतर भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना आधी ग्रामपंचायत निवडून दाखव अशी टीका केली आहे.

काय म्हणाले भुजबळ? (Chhagan Bhujbal)

भुजबळ यांनी नगरच्या सभेमध्ये आधी राजीनामा दिल्याचं वक्तव्य केलं आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी दिला तर दिला राजीनामा आम्ही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेणार म्हणजे घेणार असं वक्तव्य केलं. यावर भुजबळ यांनी “तुला साधं निट उभं राहता येतं का ते बघ”, असा मनोज जरांगेंवर हल्ला केला आहे.

“ग्रामपंचायत निवडून दाखव”

“तुला साधं उभं राहता येतं का ते बघ आधी साधी ग्रामपंचायत निवडून दाखव. मी दोन वेळा आमदार झालो. मुंबईचा 25 वर्षे महापौर होतो. त्यानंतर येवल्याला चारवेळा आमदार झालो आहे”, असं ते म्हणाले आहेत.

“…तर आम्ही त्यांचे उपकार मानू”

अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र ओबीसी समाज त्यांना विरोध करत आहे. यावर भुजबळ देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर सतत टीका करत आहेत. त्यांच्यामध्ये आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना ओबीसीतून आरक्षण मागणं बंद करावं आम्ही त्याचे उपकार मानू, असं भुजबळ म्हणाले आहेत.

“आमच्या नाभिक आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारला”  

मनोज जरांगे पाटील यांनी अनेक दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत सरकारकडे मागणी करत आहेत. कधी ते धनगर समाजाच्या बाजूनं बोलतात तर कधी नाभिक समाजाच्या बाजूनं बोलतात मनोज जरांगे पाटील हे नाभिक आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारत आहेत, असं भुजबळ म्हणाले आहेत.

News Title – Chhagan Bhujbal On Manoj jarange Patil 

महत्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

‘खूप काही चुकीचं…’; रोहित शर्माची पत्नी रितीकाच्या कमेंटने खळबळ

‘माझ्या मुलीला डॉक्टरांच्या हातात देताना….’; मुलीच्या ओपन हार्ट सर्जरीबाबत करण सिंह ग्रोवरचा मोठा खुलासा

58 वर्षांच्या आमिर खानला करायचाय ‘रोमान्स’, थेट म्हणाला…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी झाले चकित!

Join WhatsApp Group

Join Now