Chhagan Bhujbal l राज्यात काल विधानसभा निवडणूक पार पडली आहे. अशातच आता महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र आता राज्यात कोणाचं सरकार येणार यासंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकांना योजनांचा फायदा झाला :
राज्यातील लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे महाराष्ट्रात सरकार आमचंच येणार असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीचे तीन-चार कंपन्यांचे एक्झिट पोल आले आहेत. मात्र एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र गेल्या सहा महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणारी योजना देखील आहे.
तसेच शेतकरी सन्मान योजनेचे पैसे बारा हजार वरून पंधरा हजार रुपये केले आहेत. याशिवाय मुलींना फुकट शिक्षण देण्याची योजना आहे. मात्र शेतकऱ्यांना एक रुपया घेऊन लाख दहा लाख रुपये पर्यंत पीक विमा दिला आहे. तसेच महिलांसाठी एसटीचे भाडे देखील अर्धे केले आहे. त्यामुळे लोकांना या योजनांचा प्रचंड फायदा झाला आहे असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
Chhagan Bhujbal l राज्यातील विकास काम मोठ्या प्रमाणात झाले :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना 1500 ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असा विश्वास दिला आहे. तसेच अर्ध एसटीची भाडे देखील पूर्ण पणे माफ करू असे म्हणले आहे. तसेच राज्यातील विकास कामे देखील भरपूर मोठ्या प्रमाणात झाले आहेत.
याशिवाय समृद्धी महामार्ग देखील सुसाट केला आहे. परंतु, मुंबईमधले अनेक टर्नर्स महायुतीने केले त्यातून मोठ्या प्रमाणात सुधारणा केली. त्यामुळे डेव्हलपमेंट विकास झाला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून राज्यात महायुतीचे सरकार येईल असं भुजबळांनी म्हटलं आहे.
News Title – Chhagan Bhujbal on Maharashtra Exit Poll
महत्त्वाच्या बातम्या-
“ही लढाई हिंदुत्वाची, आपला धर्म वाचवायचा..”; केतकी चितळेचा नवा व्हिडिओ समोर
विधानसभेत जरांगे फॅक्टर ठरणार फेल?, एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज
‘सुशीलकुमार व प्रणिती शिंदे भाजपची बी टीम’; सोलापुरात ठाकरे गटाचा संताप
भाजपला बसणार धक्का, ‘इतक्या’ जागा मिळणंही कठीण?; एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज
आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग, देवी लक्ष्मी कुणाच्या इच्छा पूर्ण करणार?






