‘मला सोनिया गांधी मुख्यमंत्री करणार होत्या’; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

On: December 17, 2024 4:55 PM
chhagan bhujbal
---Advertisement---

chhagan bhujbal l सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेक आमदार नाराज असल्याचं चित्र राज्यामध्ये दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी त्यांच्या मनातील नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. कारण छगन भुजबळ यांना अजित पवार गटाकडून मंत्रिपद मिळालं नाही. यासंदर्भात छगन भुजबळ यांनी आज येवल्यात आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली आहे. यावेळी बैठकीदरम्यान त्यांनी अनेक गोष्टींचा गौप्य्स्फोट केला आहे.

भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिल्या मोलाच्या सूचना :

यावेळी छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा उल्लेख करत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. सोनिया गांधी आपल्याला एकेकाळी मुख्यमंत्री करणार होत्या, असं आमदार छगन भुजबळ म्हणाले आहेत. तसेच छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना देखील दिल्या आहे. “ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्यांचं काम करायचं आहे. तसेच सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं. कोणाविषयी मनात राग ठेवायचा नाही. आपण सगळे एकजुटीने काम करायचं आहे. तसेच अडचणीच्या काळात देखील विरोधकांना आपण मदत करणार. त्यामुळे कोणाविषयी दुष्मनी विसरून जा. तसेच आरक्षणाचा भुलभूईय्या देखील संपणार आहे” असं आमदार छगन भुजबळ म्हणाले आहेत.

chhagan bhujbal l भुजबळांनी केला मोठा गौप्यस्फोट :

भुजबळ पुढे म्हणाले, “काही लोकांनी अजितदादांना धन्यवाद देखील दिले. कारण मला मंत्री केलं नाही म्हणून. तसेच मला मंत्रिपद अनेकदा मिळाली. त्यामुळे आता नाही भेटलं, त्याचा काहीही वाद नाही. परंतु, मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो, आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणं देखील सुरू आहेत. तसेच मी विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मी काम केलं. तसेच 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री देखील झालो असतो. कारण मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन देखील आले होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका. तसेच आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी पवारांच्या सोबत गेलो”, असा मोठा गौप्यस्फोट आमदार छगन भुजबळ यांनी केला आहे.

News Title – chhagan bhujbal big claim about sonia gandhi

महत्त्वाच्या बातम्या-

संसदेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला ‘इतकी’ मते विरोधात पडली!

मी लहान खेळणं वाटतो का? भुजबळांनी मनातली सगळीचं खदखद बाहेर काढली

सरपंचाच्या निर्घृण हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण!

“माझं मंत्रिपद कोणी नाकारलं”, छगन भुजबळ कडाडले

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now