Cheapest Petrol Diesel Country | एकीकडे भारतासह जगभरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत असताना, दुसरीकडे अजूनही जगात एक असा देश आहे जिथे पेट्रोलच्या किंमती एका कप चहा किंवा पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या देशात फक्त ₹3 प्रति लिटर दराने पेट्रोल विकले जाते. (Cheapest Petrol Diesel Country)
जगात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळतं? :
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला हा देश सध्या जगात सर्वात स्वस्त पेट्रोल व डिझेल विकणारा देश आहे. उपलब्ध माहितीनुसार, इथे पेट्रोलचा दर फक्त $0.035 प्रति लिटर, म्हणजेच सुमारे ₹3.02 प्रति लिटर आहे.
हे दर इतके कमी असण्यामागे मुख्य कारण म्हणजे व्हेनेझुएलाकडे जगातील एकूण कच्च्या तेलाच्या साठ्यापैकी 18.2% साठा असलेली मोठी संपत्ती आहे.
स्वस्त पेट्रोल पण महागाईचा कहर :
पेट्रोलचे दर कमी असले तरी, व्हेनेझुएलामध्ये सर्वसामान्य जनतेच्या अडचणी मात्र संपलेल्या नाहीत. देशात अन्नधान्य, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू अत्यंत महाग आहेत. महागाईचा दर इतका जास्त आहे की लोकसंख्येचा मोठा भाग दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरतो आहे. एकेकाळी श्रीमंत देश म्हणून ओळखला जाणारा व्हेनेझुएला आज आर्थिक संकटात सापडलेला देश आहे.
Cheapest Petrol Diesel Country | भारतामध्ये पेट्रोलचे दर आणि भविष्यातील शक्यता :
सध्या भारतात पेट्रोलचे दर सरासरी ₹100 प्रति लिटरच्या आसपास आहेत. पाकिस्तानसारख्या देशांमध्ये हे दर आणखी जास्त आहेत. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलासादायक संकेत दिले आहेत की, कच्च्या तेलाच्या किमती भविष्यात कमी होऊ शकतात. भारताने ऊर्जा आयात धोरणात बदल करून विविध देशांमधून आयात सुरू केली आहे. (Cheapest Petrol Diesel Country)
त्यांच्या मते, भारत आता फक्त काही देशांवर अवलंबून नसून, तेल आयात करणाऱ्या देशांची संख्या २७ वरून ४० वर नेण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे.






