IT Sector News | देशातील सर्वात मोठ्या आयटी (IT) कंपनी TCS (Tata Consultancy Services) सध्या नोकरीबंदीच्या वादाच्या भोवऱ्यात आहे. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की सुरुवातीला फक्त 2 % कर्मचाऱ्यांना म्हणजे सुमारे 12000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं जाईल, परंतु विविध अहवालानुसार प्रत्यक्षात ही संख्या 30 हजाराहून अधिक असू शकते. तर काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार 80 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून बाहेर काढल्याचं सांगितलं जात आहे.
कर्मचाऱ्यांवर राजीनामा देण्याचा दबाव
कर्मचार्यांच्या मते, HR विभागाकडून दबाव निर्माण केला जात असून, अनेकांना जबरदस्ती राजीनामा देण्यास भाग पाडलं जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, काम संपल्यानंतर किंवा नवीन प्रोजेक्ट मिळाल्यानंतरही त्यांना कामावरून काढलं जात आहे. काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांकडून लाखोंच्या वसुलीचा दबावही असल्याची तक्रार आहे.
अनेक कर्मचारी म्हणतात की, कंपनीत फ्लुइडीटी लिस्ट (बदलासाठी ठेवलेली यादी) तयार केली जाते. या यादीत नाव आल्यानंतर, कर्मचाऱ्याचे कौशल्य कितीही असले तरी त्याला नवीन प्रोजेक्ट दिला जात नाही आणि सतत राजीनाम्याचा दबाव ठेवला जातो. तसेच, काही कर्मचारी दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करत असताना देखील कंपनीतून धोका निर्माण होतो.
इतर कंपन्यांवर होणारा परिणाम
TCS सारख्या मोठ्या कंपनीत होणाऱ्या या नोकरीबंदीमुळे पूर्ण आयटी क्षेत्रात (IT Sector) नोकरी जाण्याची भीतीची भावना आहे. अनेक आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यासंबंधी नियम आणि धोरणे पुन्हा तपासत आहेत. तसेच, कर्मचार्यांच्या कामाचे संतुलन राखण्यासाठी आणि अफवा रोखण्यासाठी इतर कंपन्यांनाही कठोर उपाययोजना कराव्या लागतात.
2024 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) 42,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे, ज्यामुळे त्यांच्या एकूण कर्मचार्यांची संख्या 3.89 लाखांहून 3.47 लाखांपर्यंत घसरली.
टायटनने (Titan) 2024 मध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले.
तसेच Unacademy, Ola Electric, Flipkart, Swiggy या कंपन्यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
या परिस्थितीमुळे IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती, असुरक्षा आणि मानसिक ताण वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
News Title :- Chaos in the IT sector: Over 30,000 employees laid off from TCS






