महसूलमंत्री अ‍ॅक्शनमोडमध्ये! वाळू माफीयांचे धाबे दणाणले

On: December 23, 2024 12:45 PM
Chandrashekhar Bawankule
---Advertisement---

Chandrashekhar Bawankule l मंत्रिमंडळात महायुती सरकारने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राज्याच्या महसूलमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र यानंतर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यामुळे आता वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

वाळू माफीयांचे धाबे दणाणले :

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेसाठी त्रासदायक ठरलेल्या राज्यातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देणार असल्याचं म्हंटल आहे. त्यामुळे आता वाळू विषयक सुलभ धोरण आणणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्यानंतर विदर्भातील वाळू माफीयांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

राज्यात वाळू तस्करी ही भंडारा, ब्रम्हपूरी, वरोरा, गोंदिया, नागपूर, वर्धा, गडचिरोली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे तेथील वाळू तस्करी थांबवण्यासाठी लवकरच महत्वाचं पाऊल उचलणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. दरम्यान, आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अ‍ॅक्शनमोडमुळे महसूल विभागाच्या रडारवर वाळू तस्कर आले आहेत.

Chandrashekhar Bawankule l चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले? :

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देणार आहे. तसेच वाळू विषयक सुलभ धोरण देखील लवकरच आणणार आहे. याशिवाय जनतेला वाळू सहज उपलब्ध होण्याकरता धोरण आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

याशिवाय महसूल विभागामुळं जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मात्र हे चित्र मी पाहू शकत नाही. त्यामुळे देशातील सर्वात चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल अशी ओळख मी निर्माण करणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हंटल आहे. याशिवाय वाळू माफियांवर अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास त्यांच्यावर देखील थेट कारवाई होणार असल्याचं महसूलमंत्री यांनी म्हंटल आहे. त्यामुळे आता राज्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

News Title : Chandrashekhar Bawankule On Sand Mafiya

महत्वाच्या बातम्या –

‘या’ आठवड्यात ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार, पाहा सुट्ट्यांची यादी

अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी वडिलांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

महिलांची संक्रांत गोड होणार, जानेवारीतच मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे?

“महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, ते चुकून भारताचे…”; प्रसिद्ध गायकाचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्रातील राजकारण तापणार?; राहूल गांधी आज परभणीत, सूर्यवंशी कुटुंबाला भेटणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now