“पैशांच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे…” नाना पटोले स्पष्टच बोलले

On: December 12, 2024 11:55 AM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये भाताला घवघवीत यश मिळालं आहे. यानंतर आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात देखील केली आहे. तर महाविकास आघाडी अद्यापही पराभवातून बाहेर पडलेली नाही. दरम्यान, महाविकास आघाडीतूल काही खासदार-आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यामुळे आता राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा सुरू झाली आहे.

नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया :

मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोडून काढला आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा दावा खोडून काढताना, भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’ असल्याची टीका देखील त्यांनी भाजपवर केली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होत. तर त्यावेळी भाजपला राज्यामध्ये मोठा फटका बसला. त्यामुळे भाजपला केंद्रात सरकार स्थापनेसाठी घटकपक्षांचे देखील सहकार्य घ्यावे लागले आहे. मात्र यावेळी भाजपचेे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

Maharashtra l पक्ष प्रमुखांकडून दुर्लक्ष :

केंद्रामध्ये भाजपला संख्याबळ वाढविण्याची जास्त गरज असून राज्यात प्रचंड बहुमत असल्याने आमदारांची तेवढी निकड नसल्याचं लोकसभेला दिसून आलं आहे. परंतु पक्षाकडून पाठबळ मिळत नाही आणि पक्ष प्रमुखांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. याशिवाय मतदारसंघातील जनतेचे अनेक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने देखील सध्या फारसे प्रयत्न होत नाहीत अशी महाविकास आघाडीतील काही खासदारांची तक्रार असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले आहे.

News Title – chandrashekhar bawankule congress nana patole allegations on operation lotus 

महत्त्वाच्या बातम्या :

भाजपचा मेगा प्लॅन तयार! पुढील टार्गेट पुणे महानगरपालिका

मंत्रीमंडळ विस्तारापूर्वीच दोन्ही पवारांची दिल्लीत भेट, नव्या राजकीय समिकरणांची नांदी?

सर्वात मोठी बातमी! अजित पवार शरद पवारांच्या भेटीला, दिल्लीत मोठी खलबतं?

काका शरद पवारांना अजितदादांकडून वाढदिवशी खास शुभेच्छा; म्हणाले…

सत्तेची गणितं फिरली तशी सोन्यानेही रंग बदलले; गेल्या 5 वर्षांत ‘असे’ वाढले भाव

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now