चंद्रकांत पाटील यांचा कमिन्सच्या कर्मचाऱ्यांशी संवादाने प्रचाराचा समारोप

On: November 19, 2024 12:57 PM
Chandrakant Patil
---Advertisement---

पुणे | महाराष्ट्रातल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या. सर्व पक्षांच्या सांगता सभा झाल्या उमेदवारांनी देखील प्रचाराचा समारोप केला. महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी देखील कमिन्सच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत प्रचाराचा समारोप केला.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी कमिन्सच्या कर्यचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कमिन्स कर्मचाऱ्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना जास्तीत जास्त मतदान करुन विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, सरचिटणीस विठ्ठल आण्णा बराटे, दीपक पवार, नवनाथ जाधव, राजाभाऊ बराटे, बाळासाहेब टेमकर, अमित तोरडमल, बाळासाहेब दांडेकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुधीरबापू सरोदे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत चंद्रकांतदादा पाटील यांचे काम सर्वसमावेशक आहे. कोणतीही जात पंथ यांचा विचार न करता तुम्ही प्रत्येक घटकांसाठी काम केले आहे. त्यामुळे तुम्हाला विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करु, अशी कामगार युनियनच्या वतीने ग्वाही दिली.

महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून वाढते जनसमर्थन मिळत असून याआधी आज एका ज्येष्ठ नागरिकाने कवितेच्या माध्यमातून विक्रमी मतांनी पाटील (Chandrakant Patil) यांना विजयी करण्याचा संकल्प केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळे संजय शिरसाटांचं टेन्शन वाढलं?

बारामतीमध्ये खळबळ; श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये धडकले पोलीस, नेमकं काय घडलं?

ग्राहकांना झटका! निवडणुकीपूर्वीच सोनं महागलं, भावात एकदमच झाली ‘इतकी’ वाढ

मतदान कार्ड हरवलंय? तर या ओळखपत्रांआधारे करता येणार मतदान

निवडणुकीत उतरलेल्या 19 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे, सर्वाधिक गुन्हेगार भाजपात?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now