Chandrababu Naidu | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी मागील YSRCP सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी तिरूपती बालाजी देवस्थानमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रसादाबद्दल अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. जगप्रसिद्ध तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा, असा अतिशय धक्कादायक आरोप नायडू यांनी केला आहे. (Chandrababu Naidu)
आंध्र प्रदेशमध्ये या आरोपांमुळे वाद निर्माण झाला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीनं भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.
चंद्राबाबूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
तिरुपतीच्या लाडूंबद्दल करण्यात आलेल्या या दाव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. वायएसआर काँग्रेसवर निशाणा साधत नायडू यांनी हा आरोप केलाय. मात्र, आता प्रसादात शुद्ध तुपाचा वापर केला जातो. तसेच, मंदिरातील सर्व काही स्वच्छ करण्यात आलं आहे. यामुळे गुणवत्ता सुधारली असल्याचं चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं.
एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना नायडू यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून देण्यात येणाऱ्या प्रसादाबद्दल खळबळजनक दावा केला. तिरुमला प्रसादाचे लाडू निकृष्ट घटकांनी बनवले जातात, असं त्यांनी म्हटलं. या आरोपांनंतर वायएसआर काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. (Chandrababu Naidu)
वायएसआर काँग्रेसकडून प्रत्युत्तर
“चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला गंभीर हानी पोहोचवलीये.तिरुमला प्रसादबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहेत. कोणीही असे शब्द बोलू नयेत.”, असं वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी यांनी म्हटलं आहे. (Chandrababu Naidu)
News Title : Chandrababu Naidu shocking claim about Tirupati Prasad
महत्वाच्या बातम्या –
आता पालकांसह मुलांचंही भविष्य होणार सुरक्षित; मोदी सरकारने आणली भन्नाट स्कीम
आजचा गुरुवारचा दिवस शुभ की अशुभ?, वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
3 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉल, इंटरनेट; ‘या’ कंपनीने लाँच केला भन्नाट प्लॅन
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सविस्तर
‘या’ दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात पाहता येणार सिनेमा; असं बुक करा तिकीट






