Chandra Grahan 2025 | 7 सप्टेंबर 2025 रोजी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. वैदिक परंपरेनुसार, गर्भवती महिलांनी या काळात काही विशेष काळजी घेणे आवश्यक मानले जाते. कारण ग्रहणाच्या किरणांचा गर्भावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी काय करावे आणि काय टाळावे, याबद्दल जाणून घेऊया. (Chandra Grahan 2025)
काय करु नये? :
टोकदार वस्तू वापरू नका – सुई, कात्री, चाकू यांसारख्या वस्तू हाताळणे टाळा. यामुळे अशुभ परिणाम होतात, असे मानले जाते.
ग्रहण थेट पाहू नका – चंद्रग्रहणाचे किरण गर्भावर वाईट परिणाम करू शकतात, अशी धारणा आहे.
घराबाहेर पडणे टाळा – विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर जाणे किंवा अंधाऱ्या जागी जाणे योग्य नाही.
अन्न शिजवणे आणि खाणे टाळा – ग्रहण काळात अन्न दूषित होते, असे मानले जाते. त्यामुळे या काळात नवे अन्न तयार करणे किंवा खाणे टाळावे.
Chandra Grahan 2025 | काय करावे? :
अन्न संरक्षित ठेवा – आधी बनवलेल्या अन्नात तुळशीची पाने ठेवावीत.
शांतपणे घरात राहा – धार्मिक ग्रंथांचा अभ्यास किंवा मंत्रजप करणे शुभ मानले जाते. हनुमान चालीसा, गायत्री मंत्र यांचा जप विशेष फलदायी मानला जातो.
ग्रहणानंतर स्नान करा – शक्य असल्यास गंगाजलाने स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. (Chandra Grahan 2025)
दानधर्म करा – ग्रहण संपल्यानंतर दान करणे पुण्यकारक मानले जाते.
सूचना:
हे नियम पारंपरिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहेत. वैद्यकीय दृष्टिकोनातून, गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.






