7 सप्टेंबरला होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे ‘या’ ३ राशींचे बदलणार नशीब, होणार अचानक धनलाभ

On: September 1, 2025 11:50 AM
Chandra Grahan 2025
---Advertisement---

Chandra Grahan | 2025 मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण येत्या 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. वैदिक पंचांगानुसार, हे ग्रहण भाद्रपद पौर्णिमेला होणार असून ते भारतातही दिसणार आहे. ग्रहणाचा कालावधी रात्री 09:58 ते पहाटे 01:26 असा असेल. एकूण 3 तास 28 मिनिटे 02 सेकंद हे ग्रहण दिसेल. सुतककाळही या ग्रहणासाठी लागू असेल.

या ग्रहणाचा परिणाम सर्व राशींवर होणार असला तरी, मिथुन, कर्क आणि मकर या तीन राशींवर त्याचा विशेष शुभ परिणाम होईल. चला तर जाणून घेऊया कोणते बदल घडतील. (Chandra Grahan)

मिथुन राशी :

चंद्रग्रहण मिथुन राशीच्या व्यक्तींना आर्थिक समृद्धीचे दार उघडून देऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना अधिक स्रोतांमधून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश व उत्तम निकाल मिळेल. व्यावसायिकांना अपेक्षित नफा होईल आणि त्यांच्या प्रयत्नांना गती मिळेल.

Chandra Grahan | कर्क राशी :

कर्क राशीच्या जातकांसाठी चंद्रग्रहण लाभदायी ठरणार आहे. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र असल्याने या काळात व्यावसायिकांना कामकाजात तेजी मिळेल. नोकरदारांना पदोन्नती किंवा प्रगतीची संधी मिळेल. मालमत्तेत वाढ होऊन आर्थिक बाजू मजबूत होईल. घरगुती वातावरणात समाधान व स्थैर्य निर्माण होईल. (Chandra Grahan 2025)

मकर राशी :

मकर राशीच्या व्यक्तींसाठीही हे ग्रहण अत्यंत शुभ आहे. शनीची रास असल्याने या काळात घरातील वाईट संबंध सुधारतील आणि सौख्य लाभेल. मानसिक शांती अनुभवता येईल. आर्थिक बाजू भक्कम होऊन पैशाचे संकट दूर होईल. कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील.

News Title: Chandra Grahan 2025: Lunar Eclipse on 7 September Will Bring Wealth & Prosperity for Gemini, Cancer & Capricorn

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now