Lucky Zodiac Signs | वैदिक पंचांगानुसार ७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या चंद्रग्रहणामुळे तीन राशींवर खास प्रभाव दिसून येणार आहे. हे वर्षातील दुसरे व शेवटचे चंद्रग्रहण शनीच्या कुंभ राशीत झाले. रात्री ९:५८ ते पहाटे १:२६ या वेळेत दिसलेल्या या ग्रहणाचा परिणाम भारतातील अनेक राशींवर झाला असला, तरी ज्योतिषानुसार कर्क, सिंह आणि वृश्चिक या राशींवर त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येईल.
आता प्रतीक्षा सूर्यग्रहणाची :
या चंद्रग्रहणानंतर आता २१ सप्टेंबरला होणाऱ्या वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाची उत्सुकता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण काळात लालसर छटा असलेला ‘ब्लड मून’ दिसला आणि सुतक काळ वैध ठरला. ग्रहणाच्या ऊर्जेमुळे तीन भाग्यवान राशींमध्ये आयुष्यभर लक्षात राहतील असे बदल घडतील, असा विश्वास आहे.
Lucky Zodiac Signs | कर्क राशी :
कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ सोन्याची संधी घेऊन येणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होऊन नातेसंबंध गोड होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. व्यापार किंवा गुंतवणुकीत लाभ होईल. खरेदी-विक्रीसाठी शुभ काळ सुरू होणार आहे.
सिंह राशी :
सिंह राशीच्या लोकांच्या घरात समृद्धी व आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जोडीदाराच्या व्यवसायात वाढ होईल. करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. दीर्घ आजार संपुष्टात येतील आणि आरोग्य सुधारेल. महिलांना करिअरच्या क्षेत्रात पदोन्नती मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि समाजात आदर वाढेल.
वृश्चिक राशी :
वृश्चिक राशीच्या जातकांना ऑफिसमध्ये त्यांच्या कामाची प्रशंसा मिळेल. पदोन्नतीच्या संधी निर्माण होतील. कठोर परिश्रमाचे फळ मिळून आर्थिक स्थैर्य वाढेल. शनिदेवाच्या प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता सुधारेल. स्त्रियांसाठी हा काळ विशेष शुभ असून, करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता प्रबळ आहे.






