Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या ‘चाणक्य नीती’ (Chanakya Niti) या ग्रंथातील विचार आजही तितकेच समर्पक आणि मार्गदर्शक आहेत. जीवनातील जवळपास प्रत्येक पैलूवर त्यांनी सखोल भाष्य केले आहे. पैसा कसा वाचवावा, कुठे खर्च करावा, मित्र-शत्रू कसे ओळखावेत, अशा अनेक व्यावहारिक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात की, संकटात पैसाच कामी येतो, त्यामुळे प्रत्येकाने बचत केलीच पाहिजे.
याच चाणक्य नीतीमध्ये त्यांनी मानवी स्वभावाचे आणि यशस्वी जीवनाचे रहस्य उलगडले आहे. त्यांच्या मते, जगात अशा दोन गोष्टी आहेत, ज्यांची भीती बाळगणारी व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. जाणून घेऊया त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत.
बदलांना घाबरू नका :
आचार्य चाणक्य सांगतात की, ‘बदल’ हा निसर्गाचा आणि जीवनाचा अविभाज्य नियम आहे. आपल्या आयुष्यात सतत बदल घडत असतात. परिस्थिती कधी अनुकूल असते, तर कधी प्रतिकूल. सुखानंतर दुःख आणि दुःखांनंतर सुख हे चक्र अविरतपणे सुरू असते. कोणतीही परिस्थिती कायम टिकत नाही. त्यामुळे, आयुष्यात येणाऱ्या बदलांना घाबरून जाऊ नका किंवा गोंधळून जाऊ नका.
जे लोक बदलांना स्वीकारायला कचरतात, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास घाबरतात, ते प्रगती करू शकत नाहीत. बदलांना सकारात्मकतेने स्वीकारा, त्यातून शिका आणि पुढे जात राहा. बदलांना सामोरे जाण्याचे धाडस ठेवल्यास यश निश्चित मिळते, असे चाणक्य सांगतात.
Chanakya Niti | संघर्षाला कधीही भिऊ नका :
चाणक्य नीतीनुसार, जगात कोणतीही मौल्यवान गोष्ट सहज मिळत नाही. प्रत्येक यशामागे कठोर परिश्रम आणि संघर्ष दडलेला असतो. कोणतीही वस्तू फुकट मिळत नाही, त्यासाठी कष्ट करावेच लागतात. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या संघर्षाला कधीही घाबरू नका.
तुम्ही जितका जास्त संघर्ष कराल, जितक्या जास्त अडचणींवर मात कराल, तितके मोठे यश तुम्हाला मिळेल. संघर्षामुळेच व्यक्ती अधिक कणखर आणि अनुभवी बनते. त्यामुळे, कोणत्याही कामात किंवा परिस्थितीत येणाऱ्या संघर्षाला आव्हान म्हणून स्वीकारा आणि त्याला सामोरे जा. संघर्षाला घाबरणारी व्यक्ती कधीही मोठी उद्दिष्ट्ये साध्य करू शकत नाही, असा मौल्यवान सल्ला आचार्य चाणक्य देतात.






