Chanakya Niti | अपमान सहन करणे हे अनेकदा लोक त्यांच्या शांत स्वभावाचं लक्षण मानतात. पण आचार्य चाणक्य यांचं मत यापेक्षा खूप वेगळं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अपमान एकदाच सहन केला जाऊ शकतो. तोही शहाणपणानं. पण जर एखाद्याचा अपमान वारंवार होत असेल आणि तो सहन करत असेल, तर तो मूर्ख ठरतो. चाणक्यनीतीनुसार, अपमानाचा खरा बदला म्हणजे स्वतःला इतकं यशस्वी बनवणं की अपमान करणाऱ्यालाच आपली चूक मान्य करावी लागेल.
अपमान केवळ सहन करायचा नसतो, तो योग्य वेळी योग्य मार्गानं परत करायचा असतो :
चाणक्य म्हणतात की, जो व्यक्ती शांततेनं अपमान गिळतो, त्याला ज्ञानी मानलं जातं. पण जो सतत अपमान सहन करतो त्याला दुर्बळ समजलं जातं. त्यामुळे आपला अपमान करणाऱ्याला त्याच क्षणी योग्य उत्तर देणं गरजेचं आहे, मात्र ते उत्तर रागानं नव्हे तर संयम आणि शहाणपणानं द्यावं. (Chanakya Niti)
त्यांच्या मते, मानवी आयुष्यात आदराची किंमत मृत्यूपेक्षा मोठी असते. त्यामुळे सतत अपमान सहन करणं ही कमजोरी मानली जाते. अशावेळी शांत आणि सकारात्मक पद्धतीनं समोरच्याला उत्तर द्यावं, जेणेकरून त्याला स्वतःची चूक लक्षात येईल.
Chanakya Niti | यश हेच सर्वोत्तम उत्तर! :
चाणक्यनीतीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की, अपमान सहन केल्यानंतर आपण हताश होण्याऐवजी त्याला प्रेरणा बनवून मेहनतीनं यश मिळवावं. जेणेकरून ज्यांनी आपला अपमान केला त्यांनाच कधीतरी आपल्या यशाचं कौतुक करावं लागेल.
या नीतीतून एक गोष्ट ठळकपणे समोर येते – बदला घेण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वतःला इतकं यशस्वी बनवणं की ज्यांनी आपल्याला कमी लेखलं, त्यांनाच एक दिवस आपल्या समोर झुकावं लागेल.






