व्यक्तीकडे ‘या’ तीन गोष्टी नसतील तर पैसा, सौंदर्य सगळंच व्यर्थ!

On: August 19, 2024 1:10 PM
Chanakya Niti
---Advertisement---

Chanakya Niti | भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाणारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली तत्वे आजही पाळली जातात. ते भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ होते. त्यांनी भारतीय (Chanakya Niti )राजकारणाचे नैतिक सिद्धांत स्थापित केले.

चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात. त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते.

चाणक्य (Chanakya Niti )आपल्या नीती शास्त्रामध्ये म्हणतात की, आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्याची तुलना ही पैशांसोबत किंवा सौंदर्यासोबत होऊच शकत नाही. व्यक्तीकडे जर या गोष्टी नसतील तर त्याचं सौंदर्य आणि अमाप पैसा हा काही कामाचा नसतो. आता या तीन गोष्टी नेमक्या कोणत्या, याबाबत खाली सविस्तर दिलं आहे.

व्यक्तीकडे ‘या’ 3 गोष्टी असायला हव्यात

गुणो भूषयते रूपं शीलं भूषयते कुलम् ।
सिद्धिर्भूषयते विद्यां भोगो भूषयते धनम् ।।

चाणक्य (Chanakya Niti )म्हणतात की, गुणांमुळे माणसाचे सौंदर्य वाढते. तुमच्यातील नम्रता तुमच्या कुटुंबाला वैभव प्राप्त करून देते. तसेच, पैशाचा योग्य वापर केल्याने संपत्तीचे सौंदर्य वाढते. म्हणजेच व्यक्तीचे शरीर नव्हे तर मन सुंदर असायला हवे.

निर्गुणस्य हतं रूपं दुःशीलस्य हतं कुलम्।
असिद्धस्य हता विद्या अभोगेन हतं धनम्।।

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, ज्या व्यक्तीमध्ये कोणताच चांगला गुण नसेल तर त्याचं रूप हे व्यर्थ आहे. ज्या व्यक्तीच्या आचरणात श्रेष्ठता नाही (Chanakya Niti )त्याची निंदा केली जाते. तसेच काही जणांमध्ये कोणतेही कार्य पूर्ण करण्याची शक्ती नसेल तर त्याचे ज्ञान निरुपयोगी मानले जाते.

नाग्निहोत्रं विना वेदा न च दानं विना क्रिया।
न भावेन विना सिद्धिस्तस्माद्भावो हि कारणम् ।।

याचा अर्थ(Chanakya Niti ) असा की, कर्माशिवाय वेदांचे अध्ययन व्यर्थ आहे आणि दान, यज्ञ वगैरे कर्मे निष्फळ समजली जातात. कोणतंही काम हे मन आणि भक्तीने केले पाहिजे. अन्यथा त्याशिवाय कोणत्याही कामात यश मिळत नाही.

News Title- Chanakya Niti for life

महत्वाच्या बातम्या-

प्रेग्नंसीच्या आठव्या महिन्यातही दीपिकाने केलं असं काही की..; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

आधारकार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर विसरलात तर घाबरू नका, अशाप्रकारे शोधा

येत्या काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी

कलकत्ता बलात्कार प्रकरणानंतर अर्जुन कपूरने पुरूषांना दिला महत्वाचा सल्ला!

बहिणींनो! राखी बांधताना फक्त तीन गाठी मारा, काय आहे यामागचं कारण

Join WhatsApp Group

Join Now