पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार

On: October 9, 2025 11:14 AM
Pune News
---Advertisement---

Pune News | वाहतूक मुक्त चाकण कृती समितीने (Traffic-Free Chakan Action Committee) गुरुवारी चाकण ते आकुर्डी येथील पीएमआरडीए (PMRDA) कार्यालयावर पायी मोर्चा काढला. यामुळे चाकणमधील वाहतूक कोंडी (Traffic Jam) होऊ नये, यासाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत मोर्चा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील (Vivek Patil) यांनी याबाबत आदेश दिले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. निगडी वाहतूक विभागातर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

Pune News | निगडी-प्राधिकरणातील बदल

निगडी-प्राधिकरणातील (Nigdi-Pradhikaran) काचघर चौक (Kachghar Chowk) – भेळ चौक (Bhel Chowk) – संभाजी चौक (Sambhaji Chowk) – बिगरिजनागर (Bigrijanagar) पुलापर्यंतच्या सेवा रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस (Traffic) मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांना मुख्य मार्गाने इच्छितस्थळी जाता येईल.

बिगरिजनागर पुला ते पीएमआरडीए (PMRDA) कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने एलआयसी (LIC) कॉर्नरमार्गे इच्छित स्थळी जातील.

News Title | Chakan to Akurdi Morcha Today; Traffic Diverted

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now