चाकणची वाहतुक कोंडी कायमची सुटणार? अजित पवार सर्वात मोठा निर्णय घेणार

On: September 23, 2025 4:20 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुणेकरांसाठी आणि विशेषतः पिंपरी-चिंचवड (PCMC) व चाकण परिसरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. चाकण मेट्रो विस्तार प्रकल्पावर अंतिम निर्णयासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या प्रकल्पामुळे हिंजवडी आयटी पार्क, तळवडे एमआयडीसी आणि चाकण औद्योगिक वसाहतीतील दैनंदिन वाहतुकीची कोंडी कायमची सुटण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित मार्गाची माहिती :

या नव्या मेट्रो मार्गाची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधील भक्ती शक्ती चौकापासून (Bhakti Shakti Chowk) होईल. मार्गात मुकाई चौक, भूमकर चौक, भुजबळ चौक, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, टाटा मोटर्स कंपनी, तळवडे एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसी अशा महत्वाच्या ठिकाणांचा समावेश असेल. हा मार्ग 41-42 किलोमीटर लांबीचा असणार असून, अंतिम आराखड्यात काही सुधारणा अपेक्षित आहेत.

अजित पवार (AJit Pawar) यांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळी पाहणी दौरे केले आहेत. पुण्यातील मेट्रो कार्यालयातही त्यांनी अलीकडेच रामवाडी-वाघोली मार्ग आणि विठ्ठलवाडी मेट्रो मार्गाच्या विकासासंदर्भात बैठका घेतल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुधारित सूचना दिल्या आणि या प्रकल्पाला गती देण्यावर भर दिला. (Chakan Metro News)

Pune News | प्रवाशांसाठी सोयी आणि लाभ :

मेट्रोच्या (Metro) विस्तारामुळे दररोज लाखो प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी होईल. औद्योगिक व व्यापारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या मते, यामुळे आर्थिक कार्यक्षमतेतही वाढ होईल.

मेट्रो सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील अतिरिक्त वाहनांची संख्या कमी होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच प्रदूषणातही घट होईल. हा प्रकल्प फक्त वाहतुकीसाठीच नव्हे तर पर्यावरणासाठीही सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल.

News Title : Chakan Metro Expansion Final Decision Soon | Ajit Pawar & Devendra Fadnavis Meeting in Mumbai

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now