युजवेंद्र चहल-धनश्री वर्माच्या घटस्फोटामागचं खरं कारण अखेर उघड!

On: March 26, 2025 8:13 AM
Chahal-Dhanashree divorce Real Reason  
---Advertisement---

Chahal-Dhanashree divorce | युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाबाबत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या नात्याच्या समाप्तीचं खरे कारण काय, यावर अद्यापही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नव्हता. आता एका नव्या रिपोर्टमधून दोघांमधील वैचारिक मतभेद हे घटस्फोटामागचं मुख्य कारण असल्याचं समोर आलं आहे. (Chahal-Dhanashree divorce)

राहण्याच्या ठिकाणावरून झालेल्या मतभेदांमुळे घेतला घटस्फोट

20 मार्च रोजी चहल आणि धनश्रीचा घटस्फोट अधिकृतरित्या मंजूर झाला. त्यांच्या नात्याच्या समाप्तीमागे नेमकं काय घडलं होतं, हे उलगडत नव्हतं. मात्र, काही मीडिया रिपोर्टनुसार, राहण्याच्या ठिकाणावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. लग्नानंतर धनश्रीने चहलच्या हरियाणातील घरी राहण्यास सुरुवात केली होती. चहल आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा आग्रह धरत होता, तर धनश्रीला मुंबईत स्थायिक व्हायचं होतं.

धनश्रीच्या मुंबईत राहण्याच्या इच्छेमुळे दोघांमध्ये सलोखा राहिला नाही. चहलने हरियाणात आई-वडिलांसोबतच राहण्याचा निर्धार केलेला होता. या भूमिकेमुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. एकमेकांच्या जीवनशैली आणि राहणीमानातील फरकांमुळे, त्यांनी परस्पर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला, असा रिपोर्ट समोर आला आहे.

घटस्फोटाची अधिकृत माहिती आणि पोटगीचा तपशील

दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया IPL 2025 सुरू होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात पार पडली. अधिकृत निवेदनात त्यांनी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. मात्र, घटस्फोटानंतर चहलला धनश्रीला 4.75 कोटी रुपयांची पोटगी देणे बंधनकारक ठरले. यातील 2.37 कोटी रुपये चहलने आधीच दिल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे. उर्वरित रक्कमही लवकरच धनश्रीकडे जमा होणार आहे.

तथापि, या घटस्फोटामागच्या कारणांबाबत चहल, धनश्री किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

 Title : Chahal-Dhanashree divorce Real Reason  

 

Join WhatsApp Group

Join Now