CBSE Exam Date | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांना अंदाजे ४५ लाख विद्यार्थी बसणार असून, भारतासह २६ परदेशी केंद्रांवरही या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. (CBSE Exam Date)
दहावीच्या परीक्षा :
सीबीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 10वीच्या परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होतील आणि 6 मार्च 2026 पर्यंत चालतील. या कालावधीत विद्यार्थ्यांचे भाषा विषय, मुख्य विषय तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या चाचण्या घेण्यात येतील.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देखील 17 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होतील आणि 9 एप्रिल 2026 पर्यंत चालतील. या परीक्षेत एकाच शिफ्टमध्ये प्रश्नपत्रिका दिली जाणार असून, परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होईल.
CBSE Exam Date | तात्पुरत्या तारखा – अंतिम वेळापत्रक नंतर :
सीबीएसईने स्पष्ट केले आहे की या तारखा तात्पुरत्या आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांची अंतिम यादी सादर केल्यानंतरच अधिकृत वेळापत्रक (Final Date Sheet) प्रकाशित करण्यात येईल. या प्राथमिक तारखा विद्यार्थ्यांना आणि पालकांना नियोजन करण्यासाठी दिल्या आहेत. (CBSE Exam Date)
बोर्डाच्या मते, वेळेवर निकाल जाहीर करता यावा यासाठी परीक्षेच्या तारखा पुढे-पुढे न ढकलता नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे निकाल वेळेत मिळाल्याने पुढील प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही.






