अनिल अंबानी संकटात! 17 हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे ६ ठिकाणी छापे

On: August 23, 2025 1:27 PM
Anil Ambani
---Advertisement---

Anil Ambani CBI Raids | उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर कर्ज घोटाळ्याचे गंभीर आरोप होत असून, याच प्रकरणात केंद्रीय तपास संस्था सीबीआयने (CBI) शनिवारी सकाळी त्यांच्या सहा ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी केली. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी ईडीने (ED) ही छापे टाकले होते. यानंतर आता सीबीआयच्या कारवाईमुळे या घोटाळ्याची चौकशी आणखी वेग घेणार असल्याचे दिसते.

छापेमारीच्या वेळी अनिल अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. सीबीआयच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा रिलायन्स ग्रुप आणि अंबानी कुटुंब चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

नेमका आरोप काय? :

सीबीआयच्या प्राथमिक तपासणीत येस बँकेकडून घेतलेल्या तब्बल 17 हजार कोटी रुपयांच्या कर्जामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार – अंबानी यांच्या कंपन्यांनी येस बँकेकडून घेतलेले कर्ज इतर कंपन्यांकडे वळवले आहे. तसेच ही कर्जे अपेक्षित व्यवसायिक कारणांऐवजी इतर ठिकाणी वापरली गेली. (Anil Ambani CBI Raids)

याशिवाय कर्ज मिळवण्यासाठी पुरेशा हमीशिवाय रक्कम मंजूर करण्यात आली व पैसे शेल कंपन्यांद्वारे विविध व्यवहारांमध्ये खर्च केल्याचा संशय आहे. यामुळे केवळ कर्ज गैरव्यवहारच नव्हे तर मनी लाँड्रिंगचे स्वरूप या प्रकरणाला असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.

Anil Ambani CBI Raids | सीबीआयची कारवाई कशी पार पडली? :

अनिल अंबानींना तपासासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यांनी त्यासाठी 10 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, वेळ न देता सीबीआयने आज सकाळीच सहा ठिकाणी छापे टाकले.

या छापेमारीदरम्यान तपास यंत्रणेने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर पुरावे जप्त केले. सीबीआयने यापूर्वी या प्रकरणात दोन एफआयआर नोंदवले होते, ज्यावरून पुढील तपास सुरू आहे. (Anil Ambani CBI Raids)

darmyan, या प्रकरणामुळे अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स ग्रुपवर पुन्हा एकदा कायदेशीर संकट कोसळले आहे. 17 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे केवळ अंबानींच्या प्रतिमेलाच धक्का बसलेला नाही, तर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्येही चिंता वाढली आहे.

News Title : CBI Raids Six Locations Linked to Anil Ambani in ₹17,000 Crore Loan Fraud Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now