पैसे वाटपाच्या आरोपावर विनोद तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण आलं समोर

On: November 20, 2024 1:23 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar l विधानसभा मतदानाच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यातच विरारमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील विवांत या हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला. मात्र आता याप्रकरणी विनोद तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले आहेत.

आरोप सिद्ध झाल्याशिवाय मी बोलणार नाही :

यासंदर्भात माझ्याकडे 5 कोटी होते, असं सुप्रिया सुळे बोलल्या पण त्या खोटं बोलल्या आहेत. कारण त्यांनी आधी माझे पाच कोटी रुपये परत द्यावेत असं भाजप नेते विनोद तावडे म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनोद तावडे एक चांगले गृहस्थ आहेत. त्यामुळे आरोप सिद्ध झाल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही असं त्यांनी म्हंटल आहे.

याप्रकरणी विनोद तावडे म्हणाले की, “शरद पवार हे अत्यन्त परिपक्व नेते आहेत. तसेच सिनियर देखील आहेत. त्यामुळे ते मला जवळून ओळखतात. परंतु, मी अशा गोष्टीत असू शकत नाही हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.

Sharad Pawar l यामध्ये कोणतही कारस्थान नाही :

यासंदर्भात मी काल नालासोपाऱ्याला जाणार हे देखील कोणाला माहित नव्हतं. मात्र कारण मी वाडामधून निघताना आमचे उमेदवार राजन नाईक यांना फोन केला होता. परंतु कसं चाललय असं मी विचारलं. तर त्यांनी सांगितलं, आम्ही कार्यकर्ते बसलो आहोत, त्यामुळे चहाला या.

परंतु, त्यावेळी मला वाटलं की 10-12 कार्यकर्ते आहेत, म्हणून मी तिथे गेलो. परंतु यामध्ये कोणतही कारस्थान नाही, तसेच आपसातल भांडण देखील नाही असं विनोद तावडे म्हणाले आहेत.

News Title – Cash for vote allegation Vinod Tawde speaks Thanks to sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या-

सत्ता स्थापनेबाबत अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘आज तुझा मर्डर फिक्स’; सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी

भाजप अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; कुठं घडली घटना

मतदानाच्या दिवशी जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना मोठं आवाहन; म्हणाले..

‘विनोद तावडे निर्दोष, त्यांच्याकडे कोणताही पैसा सापडला नाही..’; फडणवीस स्पष्टच बोलले

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now