पैसे वाटप प्रकरणी विनोद तावडेंवर मोठी कारवाई, अडचणी वाढल्या

On: November 19, 2024 4:46 PM
Vinod Tawde
---Advertisement---

Vinod Tawde l विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला असलतानाच आता राज्याच्या राजकारणात एक खळबळजनक घटना घडली आहे. कारण विरारमध्ये तुफान राडा झाला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे. मात्र त्यानंतर विनोद तावडे थांबलेल्या विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये तब्बल 9 लाख रुपयांची कॅश देखील आढळून आली. त्यामुळे विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटणार असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे.

तावडेंवर गुन्हा दाखल :

मात्र या घटनेनंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. कारण आता या सर्व प्रकरणानंतर भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी भाजप नेते विनोद तावडे आणि उमेदवार राजन नाईक यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.

कारण राज्यात आचारसंहिता सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्यानं विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी विरारमधील तुळींज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहार.

Vinod Tawde l काय आहे नेमकं प्रकरण?

विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये तब्ब्ल 9 लाख रुपयांची कॅश आढळून आली. त्यानंतर साडेतीन तास बविआच्या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडे यांना घेराव घातला होता. यासंदर्भात बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे.

यावेळी भाजप नेते विनोद तावडे पैसे वाटणार असल्याची टीप आपल्याला भाजपमधूनच मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी प्रतिक्रिया देखील विनोद तावडे यांनी दिली आहे.

News Title –case has been registered against Vinod Tawde

महत्त्वाच्या बातम्या-

मनोज जरांगेंचं मराठा समाजाला महत्वाचं आवाहन, म्हणाले…

विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय लिहिलं?; हितेंद्र ठाकूरांच्या खुलाशाने खळबळ

एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिलं मोठं आश्वासन!

‘मला माफ करा, जाऊ द्या..’ पैसे वाटताना पकडताच तावडेंकडून विनवणी; विरारमध्ये नेमकं काय घडलं?

विनोद तावडेंनी 5 कोटी वाटले, माझ्याकडे डायरी..; विरारमध्ये बविआ-भाजपमध्ये मोठा राडा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now